स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 07:21 PM2021-03-13T19:21:41+5:302021-03-13T19:23:05+5:30

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे.

television set falls on journalist during live show in colombia watch viral video | स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

स्टुडिओमध्ये 'लाइव्ह शो' सुरू असताना पत्रकाराच्या डोक्यावर पडला भलामोठा टीव्ही; Video व्हायरल

Next

Television Set Falls on Top of Journalist: दक्षिण अमेरिकेत कोलंबिया देशात (Colombia) एक विचित्र घटना घडली आहे. स्टुडिओमध्ये लाइव्ह शो सुरू असताना एका पत्रकारावर भलामोठा टेलिव्हिजन सेट कोसळला. या घटनेत पत्रकार जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओवर विविध स्तरावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा स्टुडिओत उपस्थित सर्व सहकारी आश्चर्यचकीत झाले आणि एकच गहजब उडाला. 

टेलिव्हिजन चॅनल ईएसपीएन कोलंबियासाठी (ESPN Colombia) काम करणाऱ्या कार्लोस ओर्डूज (Carlos Orduz) याला या घटनेनंतर किरकोळ जखम झाली आहे. कार्यक्रमावेळी स्टेडिओमध्ये सहा जण उपस्थित होते. त्याचवेळी एका पत्रकाराच्या डोक्यावर मागून टेलिव्हिजनचा भलामोठा सेट पडला. टेलिव्हिजन इतका मोठा होता की तो पत्रकार त्या सेटखाली पूर्णपणे अडकला गेला. 

जखमी पत्रकारानं ट्विटरवर सांगितली घटना
टेलिव्हिजन कोसळून जखमी झालेल्या पत्रकारानं वैद्यकीय चाचणीनंतर त्याच्या नाकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे. ओर्डूज यांनी स्पॅनीश भाषेत ट्विट केलं आहे. "ज्यांनी माझ्यासोबत घडलेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आणि माझ्या तब्येतीसाठी प्रार्थना केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. मी आता पूर्णपणे ठीक आहे. देवाच्या कृपेनं माझ्या सर्व चाचण्या व्यवस्थित आल्या आहेत आणि फक्त नाकाला किरकोळ दुखापत झाली आहे. धन्यवाद", असं ट्विट ओर्डूज यांनी केलं आहे. 

व्हिडिओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज
टेलिव्हिजन चॅनलच्या स्टुडिओमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ तब्बल १५ लाख वेळा पाहिला गेला आहे. त्यास ११ हजार लोकांनी लाइक केलं आहे आणि ३३२९ लोकांनी तो शेअर केला आहे. 
 

Web Title: television set falls on journalist during live show in colombia watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.