Viral Video: पोलीस झालेल्या विद्यार्थ्याचा शिक्षेकेने केला असा सन्मान जे पाहुन तुमचेही डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:46 PM2022-05-20T14:46:05+5:302022-05-20T15:35:56+5:30

शिक्षकांसाठी असे क्षण फार अभिमानाचे आणि कौतुकाचे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस (Police) अधिकारी झालेल्या एका तरुणाने आपल्या शाळेला भेट दिल्यानंतर काय घडलं, हे पाहायला मिळतंय.

teacher gives 1100 rupees to student who becomes police officer | Viral Video: पोलीस झालेल्या विद्यार्थ्याचा शिक्षेकेने केला असा सन्मान जे पाहुन तुमचेही डोळे पाणावतील

Viral Video: पोलीस झालेल्या विद्यार्थ्याचा शिक्षेकेने केला असा सन्मान जे पाहुन तुमचेही डोळे पाणावतील

googlenewsNext

शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी आयुष्यात कुठेही असले, कितीही यशस्वी झाले तरी त्यांच्यामध्ये शाळेत पुन्हा जाण्याची त्यांना ओढ असते. शाळेतील मित्र-मैत्रिणी, आवडीचे शिक्षक, शाळेतील गमती या सर्व त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. अनेक विद्यार्थी चांगली नोकरी मिळाल्यावर किंवा व्यवसायात यश मिळाल्यानंतर आपल्या शाळेमध्ये आवर्जुन जातात, शिक्षकांची भेट घेतात. शिक्षकांसाठी असे क्षण फार अभिमानाचे आणि कौतुकाचे असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पोलीस (Police) अधिकारी झालेल्या एका तरुणाने आपल्या शाळेला भेट दिल्यानंतर काय घडलं, हे पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला एक तरुण शाळेच्या वर्गात उभा आहे. पोलीस अधिकारी झाल्यानंतर हा तरुण त्याच्या शाळेत भेट द्यायला आला आहे आणि त्याला पाहून सर्वजण खूप खूश होतात. त्या सर्वांपैकी सर्वांत जास्त आनंद शाळेतील एका शिक्षिकेला (Teacher) झाल्याचं दिसतंय. ती शिक्षिका त्या तरुणाची ओळख वर्गातील विद्यार्थ्यांची करून देते. तसंच त्या मुलाचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा, असंही सांगते. 'झी न्यूज' नं वृत्त दिलं आहे.

पुढे शिक्षिका म्हणते, ‘या मुलाने फक्त देशाचंच नाही तर त्याच्या आई-वडिलांचं आणि समाजाचंही नाव उज्ज्वल केलंय. तुम्ही सर्वांनी त्याचा आदर्श घ्या आणि त्याच्यासारखे बना. तुम्हीही मोठी व्यक्ती व्हाल आणि तुम्हालाही योग्य सन्मान मिळेल.’


शिक्षिका बोलत असताना त्यांच्या हातात काही पैसे दिसत आहेत. त्यांचं बोलून झाल्यानंतर वर्दीतला तरुण शिक्षिकेच्या पाया पडतो, त्यानंतर शिक्षिका हातातले पैसे या तरुणाला बक्षीस म्हणून देतात. शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याला १ हजार १०० रुपये बक्षीस म्हणून दिल्याचं कळतंय. यावेळी तरुण आणि शिक्षिका खूप खूश दिसत आहेत. तर वर्गात उपस्थित मुलं टाळ्या वाजवू लागतात.

Web Title: teacher gives 1100 rupees to student who becomes police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.