लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 03:05 PM2021-04-11T15:05:39+5:302021-04-11T15:13:07+5:30

Viral News in Marathi : एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्जा तयार करण्याचा नवीन स्त्रोत असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

Tailpower anand mahindra shared a cute animal video he says i think its new form of energy | लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....

लय भारी! हा आहे वीज निमिर्तीचा जबरदस्त जुगाड; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ अन् म्हणाले....

Next

(Image Credit - India Today)

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असतात.  आपल्या गमतीदार ट्विट्सच्या माध्यमातून फोटो किंवा व्हिडीओ शेअर  करत ते नेहमीच लोकांचे मनोरंजन करतात. जास्तीत जास्तवेळा भारतीय लोकांच्या जुगाडाचे  फोटो आनंद महिंद्रांनीसोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उर्जा तयार करण्याचा नवीन स्त्रोत असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. 

आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, पाहायला गेलं तर हे फक्त क्यूट प्राणी लोकांना वाटू शकतात. पण मला असं वाटतं की, या माध्यमातून लोकांनी उर्जाचे स्त्रोत शोधला आहे. #tailpower या हलत असलेल्या शेपटांना टरबाईन आणि प्रेस्टोशी सोडून तुम्ही वीज मिळवू शकता.  आतापर्यंत या व्हिडीओला १४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर ३८८ लोकांनी या व्हिडीओवर गमतीदार कमेंट्स केल्या आहेत.  एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा  व्हिडीओ पाहिला आहे.

 नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार 

काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल डिस्टेंसिंगसाठी संदेश देणारा  एक फोटो  शेअर केला होता. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.  आनंद महिंद्रांनी ट्विटरवर कॅप्शनसह एक फोटो शेअर केला  होता, त्यासह त्याने लिहिले  होते की, "स्पष्टपणे, आम्ही सोशल डिस्टेंसिंगची काळजी  घेत नाही. पण आता विचार करण्याची आणि मास्क बदलण्याची वेळ आली आहे." सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.. 

Man finds out new way to avoid social distancing rules anand mahindra said we re not accustomed to social distancing | बाबो! सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.....

फोटोमध्ये एक माणूस एका काउंटरवर उभा असल्याचे पाहता येईल. ज्यामध्ये ग्राहक आणि अधिकारी यांच्यात काचेचा अडथळा आहे. काउंटरच्या दुसर्‍या बाजूला उभी असलेली व्यक्ती केबिनच्या आत बसलेल्या अधिकाऱ्याशी बोलण्यासाठी कट-आऊट छिद्रातून डोकं आत टाकताना दिसून येत आहे. अशा वेळी जेव्हा कोविड -१९ चे रुग्ण देशभरात वाढत आहेत, तेव्हा हे चित्र आपल्या सर्वांना धोक्याची सुचना  देणारं आहे. आनंद महिंद्रांनी आपल्या फॉलोअर्सना “मास्क घाला” असे सांगत आवाहन केलं  होतं. 

Web Title: Tailpower anand mahindra shared a cute animal video he says i think its new form of energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.