अधुऱ्या स्वप्नांची कहाणी! नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, मन हेलावून टाकणारा प्रवास कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:33 PM2021-04-16T13:33:56+5:302021-04-16T13:39:56+5:30

आज अशाच एका व्यक्तीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे कधी नॅशनल लेव्हलचे बॉक्सर होते. पण आज त्यांच्या भाड्याने माल वाहक रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे.

Story of national boxer Abid Khan from NIS qualified coach to driving auto | अधुऱ्या स्वप्नांची कहाणी! नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, मन हेलावून टाकणारा प्रवास कहाणी!

अधुऱ्या स्वप्नांची कहाणी! नॅशनल लेव्हल बॉक्सरवर रिक्षा चालवण्याची वेळ, मन हेलावून टाकणारा प्रवास कहाणी!

Next

अनेक लोकांसोबत असं झालं की, ते एकेकाळी मोठे खेळाडू होते. त्यांचं नाव होतं. त्यांचा खेळ परफेक्ट होता. पण काही कारणास्तव त्यांना खेळ सोडावा लागला किंवा मोठं यश मिळूनही ते जीवनाची स्पर्धा हरले. आज अशाच एका व्यक्तीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे कधी नॅशनल लेव्हलचे बॉक्सर होते. पण आज त्यांच्या भाड्याने माल वाहक रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे. ते ओझं उचलण्याचं काम करून पोट भरतात.

आबिद खान चंडीगढमधून इंटर यूनिव्हर्सिटी आणि नॉर्थ इंडिया बॉक्सिंग चॅम्पियन राहिले आहेत. ते एस.डी. कॉलेज चंडीगढचे विद्यार्थी होते. ते पंजाब यूनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करत होते. १९८८-८९ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियालामधून बॉक्सिंगचा एक कोचिंग डिप्लोमा केला. त्यानंतर पाच वर्षे त्यांनी सेनेच्या टीम्सना ट्रेनिंग देण्याचं काम केलं. इतकं काही करूनही त्यांना त्यांच्या अनुभवानुसार काम मिळालं नाही. 

ते म्हणाले की, 'एक गरीब आणि मिडल क्लास व्यक्तीसाठी गरीबी एक अभिषाप आहे आणि त्याहूनही मोठा अभिषाप खेळ प्रेमी असणं हे आहे. ही केवळ वेळेची बर्बादी आहे. इतकी ख्याती आणि डिप्लोमा असूनही मला एक चांगली नोकरी मिळाली नाही'.

आबिद खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी त्यात त्यांचा जगण्याचा संघर्ष सांगितला आहे. ते म्हणाले की, 'मला एकही चांगली नोकरी मिळाली नाही. परिवाराचं पोट भरण्यासाठी अखेर मला हे काम करावं लागलं. माझं नशीब बरोबर नसेल किंवा माझे कनेक्शन किंवा माझे प्रयत्न ठीक नसतील. मला नाही माहीत. फक्त इतकं माहीत आहे की, मी एक चांगली नोकरी नाही मिळवू शकलो'.

ते म्हणाले की, 'दु:खं तर होतं. एक स्वप्न होतं की, डिप्लोमा करून मी यालाच आपलं करिअर बनवेल. चांगल्यात चांगला बॉक्सर तयार करणार. पण तसं होऊ शकलं नाही. याचा त्रास तर होतोच'.

एकीकडे बॉक्सिंगमध्ये करिअर करू न शकल्याचं दु:खं, दुसरीकडे लोकांच्या टोमण्यांनी आबिद यांच्या मनातील स्पोर्ट्ससाठी राहिलेलं प्रेम नष्ट केलं. आज त्यांना दोन मुलं आहेत. त्यांना ते स्पोर्ट्समन बनवणार नाहीत.

ते म्हणाले की, 'मी माझ्याच कॉलेजमध्ये चपराश्याची नोकरी मागायला गेलो होतो. ते उलट मला म्हणाले की, मी एक खेळाडू असूनही रस्त्यावर नोकरीची भीक मागत आहे. या उत्तरानंतर माझं मन दुखावलं. मी शपथ घेतली की, आपल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये कधी टाकणार नाही.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने आबिद खान यांचा व्हिडीओ शेअर करून आपल्या मनातील बोलला. तो म्हणाला की, 'हे मन हेलावून टाकणारं आहे. आणि प्रेरित करणारंही आहे की, कशाप्रकारे एका स्पोर्टपर्सनने सादगी आणि महत्वाकांक्षेसोबत काम केलं'. फरहानने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मागितला.
 

Web Title: Story of national boxer Abid Khan from NIS qualified coach to driving auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.