वृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:53 PM2019-08-16T18:53:29+5:302019-08-16T18:55:14+5:30

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही.

starving elephant paraded in sri lanka pictures went viral | वृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड

वृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड

googlenewsNext

कोलंबो- सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच 70 वर्षांच्या हत्तिणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील हत्तिणीची अवस्था पाहून अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. एवढी कुपोषित हत्तिणी पाहून सोशल मीडियावर सर्वच अवाक् झाले असून, हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या फोटोतल्या हत्तिणीचं नाव टिकीरी असून, तिला निवृत्त न करता तिच्याकडून काम करून घेतलं जातंय.

श्रीलंकेत दहा दिवसांच्या परेरा सणाचं आयोजन केलं जातं. वर्ल्ड एलिफंट डे साजरा केल्यानंतर दोन दिवसांनी या हत्तिणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या परेरा फेस्टिव्हलमध्ये टिकीरी नावाच्या हत्तिणीवर रंगीबेरंगी कपडे चढवण्यात आले असून, फेस्टिवलदरम्यान तिला दहा दिवस प्रत्येक रात्री काही किलोमीटर अंतर चालवले जात होते. या हत्तिणीवर एक माहुत बसलेलाही पाहायला मिळतोय.

या हत्तिणीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सेव्ह एलिफन्ट फाऊंडेशननं गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर श्रीलंका सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. हत्तिणीचा मालक आणि तिच्याकडून परेड करून घेणाऱ्यावर टीकेची झोड उठली आहे. पर्यटन आणि वन्यजीव मंत्री जॉन अमरातुंगा यांनी अधिकाऱ्यांना या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: starving elephant paraded in sri lanka pictures went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.