VIDEO : बाबो! अजगराने खाल्ला होता अख्खा टॉवेल, बघा डॉक्टरांनी कसा काढला बाहेर....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:36 PM2021-05-13T14:36:53+5:302021-05-13T14:36:59+5:30

मोंटी नावाच्या कारपेट पायथनने नाश्त्याच्या शोधात मालकाच्या घरातील वस्तूच खाल्ली. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये १८ वर्षाच्या पायथनने अख्खा टॉवेल खाल्ला.

Social Viral : Python swallowed entire towel this is what doctors did to extract it from her stomach | VIDEO : बाबो! अजगराने खाल्ला होता अख्खा टॉवेल, बघा डॉक्टरांनी कसा काढला बाहेर....

VIDEO : बाबो! अजगराने खाल्ला होता अख्खा टॉवेल, बघा डॉक्टरांनी कसा काढला बाहेर....

googlenewsNext

अनेकदा प्राण्यांना बघून लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, आजारी झाल्यावर त्यांच्यावर उपचार कसे होत असतील? किंवा इजा झाल्यावर डॉक्टर त्यांच्यावर मलमपट्टी किंवा ऑपरेशन कसे करत असतील. सोशल मीडियावर याची उत्तरे सहज मिळू शकतात. इतकंच नाही तर अनेक व्हिडीओही असतात. अशाच एका व्हिडीओत बघायला मिळतं की, कशाप्रकारे एका अजगराच्या पोटातून अख्खा टॉवेल काढण्यात आला.

मोंटी नावाच्या कारपेट पायथनने नाश्त्याच्या शोधात मालकाच्या घरातील वस्तूच खाल्ली. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये १८ वर्षाच्या पायथनने अख्खा टॉवेल खाल्ला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. घरातील लोकांनी मोंटीला टॉवेल गिळंकृत करताना पाहिले होते. त्यामुळे ते लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. (हे पण बघा : भयंकर! आधी जीभ खाल्ली मग स्वतःची जागा मिळवली; माश्याच्या तोंडात आढळला लिंग बदलणारा किडा)

या व्हिडीओत बघायला मिळतं की, कशाप्रकारे डॉक्टरांनी या अजगराच्या पोटातून टॉवेल बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. डॉ. ओलिविया क्लार्क म्हणाले की, त्यांनी पाहिलेली ही पहिलीच घटना आहे ज्यात एका अजगराने टॉवेल खाल्ला होता.

मोंटीचं वजन पाच किलोग्रॅम आहे आणि तो तीन मीटर लांब आहे. त्याच्या पोटातील कपड्याची जागा माहीत करून घेण्यासाठी रेडिओग्राफ करावं लागलं. ज्यासाठी अजगराला बेशुद्ध केलं गेलं. डॉक्टरांनी कापडाचं टोकं पकडण्यासाठी एका लवचिक एंडोस्कोपचा वापर केला. या पूर्ण प्रोसेसचा व्हिडीओ तयार करण्यात आला. पायथनला त्याच दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. 

स्मॉल एनिमल स्पेशलिस्ट हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, 'आम्ही आमच्या एवियन आणि एस्कोटिक्स विभागात सर्व प्रकारच्या आश्चर्यजनक केसेस बघतो. पण ही केस असामान्य आणि असाधारण आहे. जर आम्ही टॉवेल काढला नसता तर तो साप मेलाही असता'.
 

Web Title: Social Viral : Python swallowed entire towel this is what doctors did to extract it from her stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.