VIDEO : ...म्हणून चक्क पाय मोडल्याची अ‍ॅक्टिंग करतो हा चतुर कुत्रा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 02:16 PM2019-08-30T14:16:54+5:302019-08-30T14:22:12+5:30

काही लोकांनी Gae नावाच्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Smart dog acting as broken leg so that food can be found easily by people video viral | VIDEO : ...म्हणून चक्क पाय मोडल्याची अ‍ॅक्टिंग करतो हा चतुर कुत्रा! 

VIDEO : ...म्हणून चक्क पाय मोडल्याची अ‍ॅक्टिंग करतो हा चतुर कुत्रा! 

Next

सध्या कुत्रासोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला असून हा कुत्रा फारच चतुर आहे. काही लोकांनी Gae नावाच्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कुत्रा त्याचा डावा पाय घासत असल्याचं दिसतं. बघताना असं वाटतं की, त्याचा पाय मोडलाय. अशात एक व्यक्ती कुत्र्याला बघण्यासाठी थांबतो, तेव्हा कुत्रा काहीच झालं नसल्यासारखा चारही पायांवर व्यवस्थित उभा राहतो.

हा व्हिडीओ बॅंकॉकचा आहे. थावेपॉर्न चोंगपलापोलुल नावाच्या सोशल मीडिया यूजरने याबाबत लिहिले आहे की, 'हा कुत्रा मी काम करत होतो त्याठिकाणी राहत होता. तो नेहमी लोकांना फसवण्यासाठी असं करत असतो. मी त्याला जेवायला देतो, पण त्याला अजूनही ही सवय आहे. तो फार चलाख आहे. मला वाटतं लोकांनी त्याला खायला द्यावं म्हणून तो असं करत असावा'.

थावेपॉर्नकडे आणखीही काही पाळीव प्राणी आहेत आणि तो रस्त्यावरील कुत्र्यांनाही वाचवतो. त्याने सांगितले की, 'आम्ही या कुत्र्याच्या दोन्ही पायांची तपासणी केली. त्याचे दोन्ही पाय ठीक आहेत. त्याला काहीही झालेलं नाही. जर त्याला काही जखम झाली असती तर मी त्याला लगेच माझ्यासोबत घेऊन गेलो असतो'.

कुत्र्याबाबतची आणखी एक अनोखी घटना लंडनमध्ये समोर आली होती. इथे एका कुत्र्याला एका व्यक्तीने व्हीलचेअर दान दिली होती. या कुत्र्याला सहा पाय होते. एका व्यक्तीने या १० आठवड्याच्या कुत्र्याच्या पिल्याला व्हीलचेअर देण्यासाठी ३५ हजार २०० रूपये खर्च केले होते. 

Web Title: Smart dog acting as broken leg so that food can be found easily by people video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.