क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 12:51 PM2020-10-09T12:51:34+5:302020-10-09T13:03:13+5:30

Viral Photo of Ratan tata News Marathi :अनेकांनी म्हटलं आहे की,  जर तुम्ही सिनेमांमध्ये काम केलं असतं तर सुपरस्टार झाला असतात.  काहीजणांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे. 

Ratan tata posts his school days pictures throw back thursday trend on socil media | क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....

क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....

googlenewsNext

भारतातील मोठे उद्योगपती आणि टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा नेहमीत आपले जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. रतन टाटा त्यांच्या चाहत्यांना कल्पना असेल की, थ्रोबॅक थर्सडे ट्रेंडसह त्यांनी अनेकदा आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ८ ऑक्टोबरला त्यांनी आपल्य सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर केले होते. ८० वर्षीय रतन टाटांचे इंस्टाग्रामवर ३० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.  या आधीही रतन टाटा यांनी शेअर केलेल्या पोस्टने लोकांची मनं जिंकली  होती. 

रतन टाटांनी या फोटो शेअर करताना लिहिले आहे की,' माझे मित्र रूडी आणि लोऊ यांच्याविषयी विचार करत या गुरूवारी मी शाळेच्या दिवसांचा एक फोटो पोस्ट करत आहे. माझी रिव्हरटेल कंट्री स्कूल १९५५ च्या इयरबुकचा छोटासा भाग आहे.' या फोटोला आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. रतन टाटा यांनी शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी म्हटलं आहे की,  जर तुम्ही सिनेमांमध्ये काम केलं असतं तर सुपरस्टार झाला असतात.  काहीजणांनी रतन टाटा यांना भारतरत्न दिलं जावं अशी मागणी केली आहे. अरे व्वा! बाबा का ढाब्यावर खवय्यांची तुफान गर्दी, रडणाऱ्या चेहऱ्यावर फुललं हसू, पाहा व्हिडीओ

याआधीही २३ जानेवारीला रतन टाटा त्यांना आपला थ्रोबॅक फोटो शेअर केला होता. त्यांना हा फोटो शेअर करतान म्हणलं होतं की, हा फोटो मला  बुधवारी शेअर करायचा होता पण थ्रोबॅक थर्सडे ट्रेंडसाठी मी हा फोटो आज शेअर करत आहे.  भारीच! शहामृगानं सायकलस्वारांनाही मागे टाकत जिंकली शर्यत; पाहा व्हायरल व्हिडीओ

Web Title: Ratan tata posts his school days pictures throw back thursday trend on socil media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.