अरे व्वा! न्यूझिलंडच्या भारतीय खासदार प्रियांका यांनी मातृभाषेत केलं भाषणं; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 03:05 PM2020-11-06T15:05:26+5:302020-11-06T15:07:24+5:30

Social Viral News Marathi : प्रियांका राधाकृष्णन या मुळच्या भारतीय असून न्यूझिलंडचे इतर खासदार आणि मंत्र्यांसमोर मातृभाषेत अभिमानाने भाषण करत आहेत.

Priyanka radhakrishnan gives speech in her mother toungemalayalam video goes viral | अरे व्वा! न्यूझिलंडच्या भारतीय खासदार प्रियांका यांनी मातृभाषेत केलं भाषणं; पाहा व्हिडीओ

अरे व्वा! न्यूझिलंडच्या भारतीय खासदार प्रियांका यांनी मातृभाषेत केलं भाषणं; पाहा व्हिडीओ

Next

मूळच्या भारतीय असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांनी न्यूझिलंडमध्ये खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या मातृभाषेतून भाषण केलं आहे. भाषणाच्या सुरूवातीपासूनच प्रियांका यांनी मल्याळममध्ये बोलायला सुरूवात केली.  न्यूझिलंडमध्ये एवढ्या मोठ्या पदावर पहिल्यांदाच भारतीय वंशाची व्यक्ती आली आहे. भारतीयांसाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. (priyanca radhakrishnan first indian origin minister in new zealand) आयएएस अधिकारी नितिन सांगवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रियांका यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नितिन सांगवान यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, प्रियांका राधाकृष्णन या मुळच्या भारतीय असून न्यूझिलंडचे इतर खासदार आणि मंत्र्यांसमोर मातृभाषेत अभिमानाने भाषण करत आहेत. आपली  भाषा,  खाद्यसंस्कृती, राहणीमान आपल्यासाठी गर्वाची गोष्ट असून तेच आपल्या संस्कृती- सभ्यतेचे प्रतिक आहे. 

न्यूझिलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी मंत्रिमंडळात पाच नव्या मंत्र्यांचा समावेश केला. यात प्रियांका राधाकृष्णन आहेत. दोन आठवड्यांपूर्वी न्यूझिलंडमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत अर्डन यांच्या पक्षाने न्युझिलंडमध्ये सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. पुन्हा एकदा जेसिंडा अर्डन पंतप्रधान झाल्या. Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप

प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म अन् मुळ गाव

प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म चेन्नईत झाला पण त्या मूळच्या केरळच्या आहेत. त्यांचे आईवडील केरळमधील पारावूरचे आहेत. पुढे घरच्यांसोबत त्या सिंगापूरमध्ये स्थलांतरित झाल्या. प्रियांका यांनी सिंगापूरमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणसाठी त्या न्यूझिलंडमध्ये दाखल झाल्या. उच्च शिक्षणानंतर प्रियांका न्यूझिलंडमध्येच स्थायिक झाल्या. महिला शोषण, नोकरीसाठी न्यूझिलंडमध्ये आलेल्या नागरिकांचे शोषण या मुद्यावर त्यांनी आंदोलन सुरू केले. ज्यांना कोणी ऐकत नाही त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचावा आणि न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग

Web Title: Priyanka radhakrishnan gives speech in her mother toungemalayalam video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.