एकिकडे आपला माणूस गेल्याचं दुःख; तर रुग्णावाहिका चालकांनी ६०० मीटरसाठी मागितले ३ हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:30 PM2021-05-04T20:30:44+5:302021-05-04T21:14:40+5:30

Private ambulance driver chagres 3500 : रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून एक साधी रुग्णवाहिकेचं नियोजन होऊ शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट.

Private ambulance driver chagres 3500 rupees only for 600 meters distance from covid center to cemetery | एकिकडे आपला माणूस गेल्याचं दुःख; तर रुग्णावाहिका चालकांनी ६०० मीटरसाठी मागितले ३ हजार

एकिकडे आपला माणूस गेल्याचं दुःख; तर रुग्णावाहिका चालकांनी ६०० मीटरसाठी मागितले ३ हजार

googlenewsNext

कोरोनाकाळात एखादा माणूस मेल्यानंतरही त्याच्या कसा फायदा होईल या प्रवत्तीनं अनेकजण पैसे उकळताना दिसून येत आहेत. भारतभरात अशा अनेक घटना दिसून आल्या आहेत ज्या ठिकणी माणुसकीला काळीमा फासल्याचं दिसून येत आहे. कल्याणमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणच्या आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये तर दररोज  सर्वाधिक रुग्णांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

माणुसकी सध्या किती खालच्या थरावर गेलीये याचं जिवंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.कल्याणच्या आर्ट गॅलरी या कोविड सेंटरमध्ये अरुणा पाटील ही 52 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी दाखल झाल्या होती. उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं. पण मृत्यूनंतरही त्यांना स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना किती खूप त्रास सहन करावा लागला. हा खळबळजनक प्रकार सगळ्यांच्या समोर घडत होता. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून एक साधी रुग्णवाहिकेचं नियोजन होऊ शकत नाही, ही दुर्दैवी गोष्ट. आर्ट गॅलरीच्या डॉक्टरांनी आमच्याकडे स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका नाही. तुम्ही तुमची व्यवस्था करा, असं सांगत हात वर केले. त्यानंतर कोविड सेंटरबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांनी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी बाजारच भरला होता. अखेर एका रुग्णवाहिकेनं साडेतीन हजार रुपये घेऊन स्मशानभूमीत पोहोचवलं. तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त ६०० मीटरसाठी ३ हजार रूपये आकारण्यात आले. सोशल मीडियावर या प्रकारानंतर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

सदर घटनेतील मृतक अरुणा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या एका जवळच्या नातेवाईकांनी हा धक्कादायक प्रकार फेसबुकच्या माध्यामातून समोर आणला आहे. 

 “आजपर्यंत मौत का कुवा, मौत का सौदागर एकले होतं. पण मी आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या लालचौकी येथे मौतचा तमाशा बघितला. किती भयंकर आहे सर्व. लोक मरत आहेत आणि काही लोक फक्त कमविण्यासाठी नाही म्हणता येणार पण लुटण्याच्या तयारीत आहे. आमच्या एका नातेवाईक महिलेचे तिथे निधन झाले, तर महानगर पालिकेचे डॉक्टर सांगतात आमच्याकडे सध्या स्मशानात न्यायला रुग्णवाहिका नाही. तुम्ही तुमची व्यवस्था करा. आणि खाजगी अंबुलन्सवाले जणूकाही गिधाडा सारखे बाहेर रांगेत उभे आहेत, आणि 1 किलोमीटर स्मशानात न्यायला 5 हजार रुपये दर घेतात. किती भयंकर परिस्थिती आहे. आमचे लोक प्रतिनिधी कुठे आहेत? सर्व थांबायला हवंय”, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.''
 

Web Title: Private ambulance driver chagres 3500 rupees only for 600 meters distance from covid center to cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.