प्री वेडिंग फोटोशुटचा असा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नसेल, फोटो काढताना विमानानं घेतली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 01:58 PM2021-11-17T13:58:21+5:302021-11-17T13:58:28+5:30

सोशल मीडियावर सध्या प्री वेडिंगचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील प्रचंड हसाल.

pre wedding shoot with airplane viral on social media | प्री वेडिंग फोटोशुटचा असा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नसेल, फोटो काढताना विमानानं घेतली एंट्री

प्री वेडिंग फोटोशुटचा असा भन्नाट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच नसेल, फोटो काढताना विमानानं घेतली एंट्री

googlenewsNext

आयुष्यात लग्न (Marriage) वारंवार होत नाही. त्यामुळे लग्नाचे क्षण आयुष्यभर स्मरणात राहावे यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करतात. कुणी लग्नात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतं तर कुणी ड्रोन (Dron) कॅमेऱ्यातून आपल्या लग्नाचा कार्यक्रम चित्रित करतं. आता तर प्री वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot) हा एक नवा ट्रेंडच सुरु झालाय. प्रत्येक नवरदेव-नवरी (Groom and Bride) आता लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करतं. त्यासाठी खूप सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी, हॉटेलमध्ये किंवा नदी किनारी फोटोशूट केलं जातं. त्यामागचा उद्देश एकच असतो की ते फोटो पाहून आपल्याला आयुष्यभर ते क्षण जगता येतील. पण सोशल मीडियावर सध्या प्री वेडिंगचा एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होतोय, जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील प्रचंड हसाल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक कपल प्री वेडिंग फोटोशूट करताना दिसतंय. पण ते थेट एका प्लेनच्या समोर प्री वेडिंग फोटोशूट करत आहेत. ते फोटोसाठी मस्त पोजही देतात. पण त्यांच्या पाठीमागे हवेतून एक प्लेन प्रचंड वेगाने अवकाशाच्या दिशेला झेपावतं. यावेळी प्लेनच्या प्रचंड वेगामुळे जमिनीवरची धूळ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते. विशेष म्हणजे ते प्लेन थेट या कपलच्या अगदी वरच्या बाजूने जाते. त्यामुळे प्लेनसोबत जाणारी संपूर्ण धूळ या कपलला लागते. काही क्षणांसाठी हे कपल तर धूळीमुळे अदृश्यच होतं. पण नंतर धूळ गेल्यानंतर ते पुन्हा दिसतात.

संबंधित व्हायरल व्हिडीओवर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि त्याचं लोकेशन काय ते समजू शकलेलं नाही. पण इन्स्टाग्रामवर ‘bride_buzz’ या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला आतापर्यंत 80 लाख पेक्षाही जास्त लोकांनी पाहिलं आहे. याशिवाय लाखो युजर्सने भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Web Title: pre wedding shoot with airplane viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.