१० सेकंदात झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 11:39 AM2020-08-02T11:39:35+5:302020-08-02T11:49:51+5:30

बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला या फोटोतील बिबट्या दिसून येईल.

Picture of camouflage than this susanta nanda share pic on twitter | १० सेकंदात झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

१० सेकंदात झाडामध्ये लपलेल्या बिबट्याला शोधून दाखवा; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

googlenewsNext

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर सध्या एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही एक सुंदर झाड पाहू शकता. फक्त झाडंच नाही तर या झाडामध्ये एक बिबट्यासुद्धा लपला आहे. बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला या फोटोतील बिबट्या दिसून येईल. विशेष म्हणजे या झाडावरील बिबट्या हा खरा असल्याप्रमाणे वाटत आहे. पण हा खराखुरा बिबट्या नसून झाडाच्या खोडावर तशी कलाकृती साकारण्यात आली आहे असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला खूप पसंती दिली आहे. 

ट्विटरवर हा फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही क्षणातच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओला आतापर्यंत १०० पेक्षा जास्त रिट्विटस आणि १ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.  या फोटोवर सुशांत नंदा यांनी कॅप्शन दिलं आहे की, यापेक्षा सुंदर अजून काहीही असू शकत नाही. या फोटोवर लोकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भूरसट रंगाच्या झाडाचे खोड तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. या झाडाच्या मधोमध तुम्हाला बिबट्या बसलेला दिसून येईल. खरंतर  हा बिबट्या खरा आहे की नाही याबाबत माहिती मिळणं कठीण आहे. ट्विटरवर या फोटोवर कमेंट करत सोशल मीडिया युजरने सांगितले की, मी ३० मिनिटांपर्यंत या फोटोला पाहत होतो. तर काही युजर्सनी म्हटले आहे. झाडावर खराखुरा बिबट्या बसलाय यावर विश्वासच बसत नाही. 

धोका वाढला! 'या' घरांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढतोय धोका; संशोधनातून समोर आलं कारण

Coronavirus vaccine : सर्वातआधी कुणाला दिला जाईल कोरोना व्हायरस वॅक्सीनचा डोस?

Web Title: Picture of camouflage than this susanta nanda share pic on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.