संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:49 IST2025-06-20T18:46:43+5:302025-06-20T18:49:38+5:30
या विद्यापीठाने, "मुलींना 'ब्रा' घातलेली नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही," असे फरमान जारी केले आहे.

संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल
पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियामधील एक विद्यापीठ सध्या जबरदस्त चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे परीक्षा देण्यासंदर्भात या विद्यापीठाने लागू केलेला एक अजब नियम. खरे तर, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षेसंदर्भात वेगवेगळे नियम लागू केले जातात. मात्र, या विद्यापीठाने असे फर्मान जारी केले आहे की, ज्यामुळे हे विद्यापीठ प्रचंड वादात सापडले आहे.
या विद्यापीठाने, "मुलींना 'ब्रा' घातलेली नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही," असे फरमान जारी केले आहे. एवढेच नाही तर, या निमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी, मुलींना स्पर्श करून त्यांची तपासणीही केली जात आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ ओलाबिसी ओनाबांजो विद्यापीठातील असल्याचे बोलले जाते. यात विद्यार्थीपरीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही महिला कर्मचारी विद्यार्थिनींच्या छातीच्या भागाला स्पर्श करताना दिसत आहेत. हे संतापजनक आहे.
A female staff member at Olabisi Onabanjo University in Nigeria was seen touching female students' chests as the university enforced a ‘no bra, no entry’ policy.
— Radar Africa (@radarafricacom) June 19, 2025
The incident occurred while students were queuing for exams. pic.twitter.com/iV9y1WHDW5
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकंचा संताप -
संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्याला अश्लीलपणे स्पर्श केला जात असल्याचे विद्यापीठातील विद्यार्थिनींचेही म्हणणे आहे. येथे यापूर्वीही असे नियम लागू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. माहितीनुसार,
विद्यापीठाच्या ड्रेस कोडमध्ये अशा कुठल्याही कपड्याला बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये वासना उत्पन्न होईल.
यासंदर्भात विद्यापीठाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, येथील विद्यार्थी नेत्याने या निर्णयाचे समर्थन केले आहे. हा संस्थेच्या ड्रेस कोडचा भाग आहे. यामुळे लोकांचे लक्ष विचलित होण्यापासून रोखले जाईल, असे त्याने म्हटले आहे.