Neil nitin mukesh share shocking video four cats fight a snake | VIDEO : चार मांजरांनी सापावर केला हल्ला, अन् जे घडलं ते पाहून बसेल धक्का...

VIDEO : चार मांजरांनी सापावर केला हल्ला, अन् जे घडलं ते पाहून बसेल धक्का...

साप आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याचे आपण ऐकलं आहे. पण कधी मांजर आणि सापाची भांडणं पाहिली आहेत का? बॉलिवूड स्टार नील नितिन मुकेश याने आपल्या इंस्टाग्रा अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक सापाला चार मांजरींनी घेरलं आहे. तसेच त्या चारही मांजरी त्या सापाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. एक मांजर तर धाडसाने सापावर हल्लाही करते. आपला आगामी चित्रपट बायपास रोडच्या शुटिंगदरम्यान नीलने हा व्हिडीओ शुट केला आहे. 

व्हिडीओमध्ये पाहता येईल की, मांजरींनी हल्ला केल्यानंतर सापानेही हल्ला करण्यासाठी आपला फणा काढला आहे. नील नितिन मुकेशनेही सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. व्हिडीओमध्ये पाहता येईल की, सर्वात शेवटी मांजरींना घाबरून साप माघार घेतो आणि बाजूलाच असलेल्या हिरवळीमध्ये निघून जातो. या अंगावर काटा आणणाऱ्या लढाईमध्ये कोणालाच दुखापत झाली नाही. 

व्हिडीओ शेअर करताना नीलने असं लिंहिलं आहे की, आज मी बायपास रोडच्या शुटिंगसाठी आलो. गाडीतून उतरताच हे पाहायला मिळालं. हा व्हिडीओ आतापर्यंत 77 हजार लोकांनी पाहिला आहे. तसेच एका यूजरने कमेंट केली की, कोणीतरी सर्पमित्रांना बोलावलं पाहिजे होतं. त्यांनी सापाला पकडून जंगलामध्ये सोडलं असतं. त्यावर नीलने कमेंटमध्ये उत्तर दिलं की, आम्ही स्नेक रेस्कू करणाऱ्या लोकांना बोलावलं होतं. 

नील नितिन मुकेशने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यातील एक यूजर म्हणाला आहे की, 'बिचारा साप खरचं खूप घाबरला होता.' तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'मी श्वास रोखून बसलो होतो की, एखाद्या मांजरीला काही होणार तर नाही ना?' याव्यतिरिक्त अनेक यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Neil nitin mukesh share shocking video four cats fight a snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.