कमाल! मुंबईच्या रिक्षावाल्यानं नातीला शिकवण्यासाठी घर विकलं; अन् आता दान मिळाले तब्बल २४ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 02:09 PM2021-02-24T14:09:32+5:302021-02-24T14:14:58+5:30

Trending Viral News in Marathi : २० लाख रुपये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण यापेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे. जवळपास  २४ लाख रुपये या रिक्षा चालकाला मिळाले आहेत. 

Mumbais auto driver sold house for granddaughters education then got 24 lakh rupees in donations | कमाल! मुंबईच्या रिक्षावाल्यानं नातीला शिकवण्यासाठी घर विकलं; अन् आता दान मिळाले तब्बल २४ लाख

कमाल! मुंबईच्या रिक्षावाल्यानं नातीला शिकवण्यासाठी घर विकलं; अन् आता दान मिळाले तब्बल २४ लाख

Next

मुंबईच्या रिक्षाचालकाची हृदयस्पर्शी कहाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती. आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे  ७४ वर्षीय देशराज यांनी आपल्या नातीच्या शिक्षणासाठी घर विकलं होतं. मुलाच्या मृत्यूनंतर सून आणि नातवंडाची जबाबदारी स्वीकारलेल्या या व्यक्तीनं दिवसरात्र काम करून आपल्या नातीला शिकवलं आहे. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या पेजनं या आजोबांची कहाणी लोकांसमोर आणली आणि यांना मदत करण्याचे आवाहन केलं आहे. २० लाख रुपये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण यापेक्षाही जास्त रक्कम जमा झाली आहे. जवळपास  २४ लाख रुपये या रिक्षा चालकाला मिळाले आहेत. 

ह्यूमन्स ऑफ बॉम्बे' वर या अनुभव शेअर करताना रिक्षा चालकाने लिहिले आहे की, ''६ वर्षांपूर्वी माझा मोठा मुलगा घरातून निघून गेला.  कामानिमित्त गेला आणि पुन्हा कधीच परत आला नाही. त्यानंतर एका आठवड्यानंतर माझ्या मुलाचा मृतदेह मिळाला. मुंबईच्या खारमध्ये रिक्षा चालवत असलेल्या  ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्य झाला.''  त्यांच्या वडिलांना दुःख व्यक्त करण्यासाठीही वेळही मिळाला नाही. सॅल्यूट! एनसीसी कॅम्पमध्ये ट्रेनिंगसाठी नव्हती रायफल; आयटीआय विद्यार्थ्यानं १०० रूपयात बनवली एके-47 

देसराज यांनी पुढे सांगितले की, ''जेव्हा माझी नात बारावीला  ८० टक्के मिळवून पास झाली तेव्हा पूर्ण दिवस आम्ही जल्लोश साजरा केला. मी अनेक ग्राहकांना मोफत सेवा दिला. त्यानंतर माझ्या नातीनं   बीएडच्या कोर्ससाठी दिल्लीला जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्याचवेळी माझ्या समोर एक मोठी समस्या उभी राहिली. कारण एकत्र एवढे पैसे भरून नातीला दिल्लीला पाठवणं माझ्यासाठी शक्य नव्हतं.  तरिही मी हार मानली नाही. आपलं  घर विकून नातीला दिल्लीतील शाळेत दाखल केले. '' हाय हिल्स घालून ती धाव धाव धावली; कधीही पाहिला नसेल असा स्टंट, व्हिडीओ झाला तुफान व्हायरल

Web Title: Mumbais auto driver sold house for granddaughters education then got 24 lakh rupees in donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.