ये है मुंबई मेरी जान! भर डिसेंबरमध्ये थंडीऐवजी मुंबईत पाऊस तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पूर....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 02:57 PM2020-12-11T14:57:55+5:302020-12-11T15:01:39+5:30

मुंबई हवामान विभागाने 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि 11 डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविली होती.

Mumbai wakes up to December rain, memes and jokes trend on Twitter. Best ones | ये है मुंबई मेरी जान! भर डिसेंबरमध्ये थंडीऐवजी मुंबईत पाऊस तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पूर....

ये है मुंबई मेरी जान! भर डिसेंबरमध्ये थंडीऐवजी मुंबईत पाऊस तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पूर....

googlenewsNext

राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मुंबईतील काही भागांत पावसाच्या रिमझिम सरीही बरल्याची माहिती आहे. डहाणू तालुक्यात रात्री दीड ते दोन वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. अशात मग सोशल मीडिया यूजर्सही अॅक्टिव झालेत आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आला.

मुंबई हवामान विभागाने 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि 11 डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला असून पावसाचे ढग राज्यातील अनेक भागात जमा झाले आहेत. विशेषत: मुंबई आणि कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूरमध्येही पावसाने रिमझिम सडा मारला असून दरम्यानच्या काळात हवामान खात्याने यापूर्वीच पावसाची शक्यता वर्तवली होती.  
 

Web Title: Mumbai wakes up to December rain, memes and jokes trend on Twitter. Best ones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.