पाहावं ते नवलंच! माकड चक्क भाजी विकतंय, त्याला पाहुन नेटकरी म्हणाले, ताजी भाजी कितीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:03 PM2022-01-21T18:03:12+5:302022-01-21T18:06:17+5:30

व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, दुकानावर हे माकड आरामात बसलं आहे आणि तिथली भाजी खात (vegitable, fruits) आहे.

monkey selling vegetables funny video goes viral on social media | पाहावं ते नवलंच! माकड चक्क भाजी विकतंय, त्याला पाहुन नेटकरी म्हणाले, ताजी भाजी कितीला?

पाहावं ते नवलंच! माकड चक्क भाजी विकतंय, त्याला पाहुन नेटकरी म्हणाले, ताजी भाजी कितीला?

Next

एक माकड (monkey) फुटपाथवरच्या भाजीच्या दुकानावर बसलेलं आहे. हे पाहून असं वाटतंय की माकडच या दुकानाचा मालक (vegitable seller) आहे. जे कोणी ही घटना पहात आहे, ते आश्चर्यचकीत होत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एकानं हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मध्य प्रदेशमधल्या सिवनी (Sivani, Madhya Pradesh)  या गावातून एक व्हिडिओ व्हायरल (video Viral) झाला आहे.

देशात काही ठिकाणी प्राणी आणि माणसांची गट्टी जमल्याची दिसून येते, तरी काही ठिकाणी प्राणी आणि माणदरम्यान संघर्ष निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. माणसानं प्राण्यांच्या जंगलावर अतिक्रमण केल्यानं हा संघर्ष उद्भवत आहे. माणसं प्राण्यांच्या अधिवासात जात असल्यानं प्राणीही माणसांच्या गावा, शहरांमध्ये जाऊन माणसांना त्रास देत आहेत. याचंच उदाहरण पाहायचं झाल्यास माकडं, हत्ती, नीलगाय, रानगवे, बिबटे, सिंह माणसांच्या अधिवासात येत आहेत. गावातल्या किंवा शहरातल्या अनेक धार्मिक आणि बाजारांच्या ठिकाणी माकड कायम दिसून येतात.

माणसांकडून काहीतरी फळं, अन्न खायला मिळेल या आशेवर माकडं तिथं कायम दिसतात. मध्य प्रदेशातल्या सिवनीमध्येसुद्धा असंच चित्र पाहायला मिळालं.

व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, दुकानावर हे माकड आरामात बसलं आहे आणि तिथली भाजी खात (vegitable, fruits) आहे. इथं माकडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही माकडं इथं अशाच प्रकारे माकडचेष्टा करत असतात. दुकानदार थोड्यावेळासाठी उठला आणि माकड त्याच्या जागेवर जाऊन बसलं.

हा व्हिडिओ १७ जानेवारीचा असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळावर उपस्थित एकानं या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हडिओ युजर्सना चांगलाच भावला आहे. त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. या माकडांनी गावामध्ये उच्छाद मांडला असून, त्रस्त लोकांनी याची तक्रार वन विभागाकडे केली आहे. एक दुकानदार म्हणाला, की फळं आणि भाज्या माकडांपासून लपून ठेवाव्या लागतात. ते नेहमीच भाज्या आणि फळं घेऊन पळून जातात. त्यामुळे त्यांची ग्राहकांनाही भीती वाटते.

Web Title: monkey selling vegetables funny video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.