माकडाला त्रास देत होता कुत्रा; माकडानं बघुन घेतलं, नंतर काठी घेतली अन् कुत्र्याच्या डोक्यातच हाणली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 12:35 PM2021-09-29T12:35:07+5:302021-09-29T12:35:22+5:30

काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल.

monkey hits dog with stick funny video goes viral | माकडाला त्रास देत होता कुत्रा; माकडानं बघुन घेतलं, नंतर काठी घेतली अन् कुत्र्याच्या डोक्यातच हाणली

माकडाला त्रास देत होता कुत्रा; माकडानं बघुन घेतलं, नंतर काठी घेतली अन् कुत्र्याच्या डोक्यातच हाणली

Next

सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Animals) होताना दिसतात आणि हे व्हिडिओ लोकांच्या पसंतीसही उरतात. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Funny Video of Dog and Monkey) तुम्ही पाहू शकता की एक कुत्रामाकडाला त्रास देत आहे. काही वेळ माकड हे सगळं सहन करतं. मात्र, नंतर त्याच्या लक्षात येतं हा कुत्रा सहजासहजी शांत होणार नाही. यानंतर माकड रागावतं आणि एक काठी उचलतं. यानंतर या काठीनं कुत्र्यावर जोरात हल्ला करतं. यानंतर मार लागल्यानं कुत्रा जोरजोरात ओरडू लागतो आणि तिथून निघून जातो.

वर या विनोदी व्हिडिओला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की खरंच कुत्र्यानं माकडाला अतिशय मजेशीर पद्धतीनं अद्दल घडवली आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

 

 

 

Web Title: monkey hits dog with stick funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app