सलाम! गेल्या ४० वर्षांपासून गोरगरिबांना 'इथं' मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:10 PM2020-11-16T17:10:37+5:302020-11-16T17:16:51+5:30

Viral News in Marathi :आजोबांच्यामते यांच्या ढाब्यावरून कोणीही उपाशी जायला नको. यासाठी ते मोफत जेवण द्यायलाही तयार असतात.

Meet this 72 year old man bacchudada who give free food to all | सलाम! गेल्या ४० वर्षांपासून गोरगरिबांना 'इथं' मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा

सलाम! गेल्या ४० वर्षांपासून गोरगरिबांना 'इथं' मोफत अन्न पुरवताहेत ७२ वर्षीय आजोबा

Next

(image Credit- Bachudada)

आपल्या दोनवेळचं जेवण, नाष्ता मिळत असला. तरी समाजात  काही माणसं अशी आहेत. ज्यांना दिवसभरातून एकवेळचं जेवण मिळणंही कठीण असतं. अशा लोकांसाठी समाजातील अनेकांचे मदतीचे हात पुढे येत असतात.  आज आम्ही तुम्हाला अशाच एका आजोबांबद्दल सांगणार आहोत. गुजरातच्या मोरबी शहारात  राहत असलेले आजोबा गेल्या ४० वर्षांपासून भूकेलेल्यांना अन्न पूरवण्याचे काम करत आहेत. या आजोबांच्या ढाब्याचे नाव 'बचुदादा का ढाबा' असे आहे. ४० रुपयात पोट भरून  जेवण देण्याचे काम या ढाब्याच्या माध्यमातून केलं जातं. या ढाब्याची खासियत अशी की, ज्या लोकांकडे जेवणासाठी  ४० रुपये  किंवा १० -२० रुपयेसुद्धा नसतात. त्यांना या ठिकाणी मोफत अन्न दिलं जातं. 

७२ वर्षांचे आजोबा गेल्या ४० वर्षांपासून मोरबी शहरात राहत आहेत. या आजोबांच्या ढाब्यावर पूर्ण थाळीचे  ४० रुपये असले तरी  १०  ते २० रूपयांमध्ये लोकांना या ठिकाणी जेवण  उपलब्ध होतं. जर एखाद्या गरिबाकडे तेव्हढेही पैसे नसतील तर हे आजोबा मोफत जेवण देतात. या ढाब्याच्या जेवणात भाजी, चपाती, डाळ, भात, ताक असते. ढाब्याच्या आजूबाजूला अनेक गरिब लोक राहतात. त्या ठिकाणी १० ते १५  लोक नेहमीच जेवणासाठी येतात.

आजोबांच्यामते यांच्या ढाब्यावरून कोणीही उपाशी  जायला नको. यासाठी ते मोफत जेवण द्यायलाही तयार असतात. १० महिन्यांपूर्वी या आजोबांच्या पत्नीचे निधन झाले.  हे दोघे मिळून ढाबा चालवत होते.  आता या हे  आजोबा एकटेच हा ढाबा चालवत आहेत. त्यांना एक मुलगी असून सध्या ती तिच्या सासरी असते. त्यामुळे आजोबांवर एकटं राहण्याची वेळ आली आहे. 

bachuda dhaba

इथे  रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवलं जातं

प्रवीणकुमार गोयल हे दिल्लीतील रहिवासी आहे. नांगलोई परिसरात शिवमंदीराजवळ श्याम रसोई नावानं प्रवीणकुमार आपलं छोटंसं दुकान चालवतात. या स्वयंपाकघराची खासियत म्हणजे फक्त १ रुपयात लोकांना जेवण दिलं जातं. लोकांनी फुकट समजून जेवणं वाया घालवू नये यासाठी हा एक रूपया घेतला जातो. सोशल मीडियावर प्रवीण कुमार यांच्या कार्याबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Viral Photo : Shyam rasoi serving food at just one rupee in nangloi delhi | सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा

नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

५१ वर्षीय प्रवीण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ''रोज जवळपास १ हजार लोकांना जेवण या ठिकाणी दिले जाते.  तसंच लोकांना वाटलं तर कधी पैसे, कधी रेशन याची मदत मला  करतात. सुरूवातीला मी १० रुपयांना जेवणाची थाळी पूरवत होतो. त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी, त्याचे पोट भरण्यासाठी मी फक्त १ रुपया जेवणासाठी स्वीकारायचं ठरवलं.''  बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

Web Title: Meet this 72 year old man bacchudada who give free food to all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.