मानलं गड्या! सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग अन् आता घेतोय लाखोंची कमाई

By Manali.bagul | Published: November 8, 2020 05:13 PM2020-11-08T17:13:35+5:302020-11-08T17:22:02+5:30

Inspirational Stories in Marathi : अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर कुठे नकारात्मक उत्तरं मिळत होती. तरिही मागे वळून न पाहता मयूरने हे काम सुरूच ठेवले.

Mayur Gavande earns lakh rupees by doing camphor production in yavatmal | मानलं गड्या! सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग अन् आता घेतोय लाखोंची कमाई

मानलं गड्या! सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग अन् आता घेतोय लाखोंची कमाई

googlenewsNext

इच्छा तेथे मार्ग हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. काहीतरी करण्यची उम्मेद असेल तर नक्कीच योग्य मार्ग सापडतो. अनेकजण मिळालेल्या संधीचे सोनं करत आपल्या आयुष्याला कलाटणी देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहेत. आपण सगळचे सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत दिवसभरातील जास्ती जास्त वेळ घालवतो. एका तरूणाला सोशल मीडियावर  स्क्रोलिंग करत असताना कमाईचा मार्ग सापडला आहे. या तरूणाचे नाव मयूर ज्ञानेश्‍वर गावंडे आहे. 

ब्रम्ही येथील रहिवासी असलेल्या मयूर ज्ञानेश्‍वर गावंडे यांचे कुटुंबिय वर्षानुवर्ष शेती करून आपला उदरनिर्वाह  करत आहेत. मयूरने मात्र बी.ई. मॅकेनिकल ही उच्चपदवी घेऊन आपले शिक्षणं पूर्ण केले. त्यानंतर  पुण्यातल्या एका नामांकीत कंपनीत क्वॉलिटी इंजिनिअर या पदावर दोन वर्षे नोकरी केली. या ठिकाणीही मयूरने मेहनत करून चांगली कामगिरी केली.  मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने कामधंदे ठप्प होते. अनेक कंपन्या बंद  झाल्या. अशा स्थितीत मयूरने पुणे सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला. काहीतरी करायचं असं  ठरवून सोशल मीडियावर सर्च करीत असताना एक उद्योग सुरू करण्याचा विचार डोक्यात आला.

या उद्योगाबाबत घरी कुटुंबासोबत चर्चा करून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सर्वांनीच मयूरच्या निर्णयाला पाठिंबा दिला. व्यवसायातील बारकावे समजून घेण्यासाठी   अनुभवी लोकांशी चर्चा केली. त्यातून आत्मविश्वास वाढत गेला. विविध बँकांकडे जाऊनही वेळेवर कर्ज मिळत नसल्याने अडचणी आल्या. तेव्हा घरच्यांकडे असलेल्या रकमेतून उद्योगाच्या कामांना जून व जुलै 2020पासून सुरुवात केली. त्यानंतर 'माऊली प्रॉडक्‍ट्‌स' या नावाने उत्पादनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे कच्च्या मालाचं सामान आणून घरीच उत्पादन करायला सुरूवात केली.  त्यामुळे जागेचा खर्च वाचला.

हे असलं कसलं प्रेम! पत्नीनेच गर्लफ्रेंडशी लावून दिलं पतीचं लग्न, भानगड नेमकी आहे तरी काय?

त्यानंतर मयूरने भावासह मार्केंटीग करायला सुरूवात केली. अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर कुठे नकारात्मक उत्तरं मिळत होती. तरिही मागे वळून न पाहता मयूरने हे काम सुरूच ठेवले. आता  यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील कारंजा, नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हदगावनंतर आता वर्धा जिल्ह्यात गावंडे बंधूंचा "माऊली' ब्रॅण्ड पोहोचला आहे. 

आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेऊनही आजोबांनी वयाच्या ६६ व्या वर्षी लग्न का केलं?

मयूरला व्यवसायात सहकार्य करणारा त्याचा भाऊ प्रवीण गावंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ''पुण्यातील  नोकरी सोडल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याचा मयूरचा विचार होता. आम्हाला त्याची कल्पना पटली. बाजारपेठेत काय विकले जाऊ शकते, याचा विचार करून आम्ही कापूर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर इतर साहित्य खरेदी करून घरीच उत्पादन सुरू केले. सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, आता  हळूहळू व्यवसाय स्थिर होत आहे. तीन-चार महिन्यांत १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे.

Web Title: Mayur Gavande earns lakh rupees by doing camphor production in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.