Man shares pic of giant mosquito on twitter people goes crazy | 'या' डासाचा आकार पाहून डोळे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, फोटो झालाय व्हायरल....
'या' डासाचा आकार पाहून डोळे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, फोटो झालाय व्हायरल....

नाना पाटेकर यांच्या एका लोकप्रिय डायलॉगमुळे तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की, एक मच्छर माणसाला काय बनवू शकतो. डासांमुळे जगणं कसं हैराण होतं हे सर्वांनीच अनुभव असेल. पण तरीही डासांना कधीच कुणी सिरीअस घेत नाही. डासांना लहान समजून त्यांना चिरडून मारलं जातं. पण सध्या डासाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या डासाचा आकार पाहूनच धडकी भरते मग तो चावल्यावर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी.

Ezequiel Lobo नावाच्या ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला असून याचं कॅप्शन त्याने स्पॅनिश भाषेत दिलंय. त्याचा अर्थ अशा आहे की, या डासाचा आकार बघा. हा डास माझ्या घरात घुसला आहे. नॉर्मल साइजचा डासही त्याच्या बाजूला आहे'. ही पोस्ट आता व्हायरल झाली असून आतापर्यंत १.४ लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिली आणि २३ हजारपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत. यावर लोकांच्या प्रतिक्रियाही मजेदार येत आहेत.

ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली असून लोक यावर मजेदार रिप्लाय करत आहेत. अनेकांनी तर यावर मीम्स सुद्धा तयार केले आहेत.


Web Title: Man shares pic of giant mosquito on twitter people goes crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.