माणूसकी जिंदाबाद! मगरीच्या तावडीत सापडलेल्या कुत्र्याला वाचावयला तरुणाने केलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:57 PM2021-12-05T18:57:37+5:302021-12-05T19:00:54+5:30

अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे.

man saves dog life from crocodile video goes viral | माणूसकी जिंदाबाद! मगरीच्या तावडीत सापडलेल्या कुत्र्याला वाचावयला तरुणाने केलं असं काही की...

माणूसकी जिंदाबाद! मगरीच्या तावडीत सापडलेल्या कुत्र्याला वाचावयला तरुणाने केलं असं काही की...

Next

असं म्हटलं जातं की या जगात माणुसकीपेक्षा मोठा कुठलाही धर्म नाही. त्यामुळे प्रत्येक अशा गरजू व्यक्तीची मदत करायला हवी, ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे. अनेक लोक असेही असतात जे आपलं सर्वकाही पणाला लावून समोच्याची मदत करतात. तर, काही लोक शक्य असूनही समोच्याला मदत करणं टाळतात. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात या व्यक्ती माणुसकी दाखवत एका कुत्र्याचा जीव वाचवला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुत्रा मगरींनी भरलेल्या एका तलावात अडकला आहे. तो बाहेर येण्याचा भरपूर प्रयत्न करतो. मात्र, पाण्यातून त्याला बाहेर निघता येत नाही. इतक्यात एक व्यक्ती तिथे येतो आणि या पाण्यात कापड फेकतो. यालाच पकडून कुत्रा वरती येतो आणि हा व्यक्ती मगरींच्या तावडीतून कुत्र्याला वाचवतो.

या व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, या व्यक्तीची माणुसकी पाहून माझे डोळे पाणावले. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, माणुसकीवर माझा पुन्हा एकदा विश्वास बसला. अनेकांनी म्हटलं की आपण यातून धडा घ्यायला हवा. गरजूंना मदत करायला हवी. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हि़डिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत याला 40 लाखाहून अधिका व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

Web Title: man saves dog life from crocodile video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.