Makar Sankranti Wishes : मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना तिळगूळासोबतच 'या' गोड शब्दांनीही द्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 09:51 AM2020-01-14T09:51:44+5:302020-01-14T10:05:03+5:30

Makar Sankranti Date : दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे

Makar Sankranti 2020 : Facebook, Whatsapp messages to wish your family and friends on occasion of Makar Sankranti | Makar Sankranti Wishes : मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना तिळगूळासोबतच 'या' गोड शब्दांनीही द्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes : मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना तिळगूळासोबतच 'या' गोड शब्दांनीही द्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

googlenewsNext

(Image Credit : freepik.com)

दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. पण गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हा सण १५ जानेवारीला साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (13 जानेवारी), संक्रांती (14 जानेवारी) व किंक्रांती (15 जानेवारी) अशी नावे आहेत. हा सण दरवर्षी साजरा केला जात असला तरी अनेकांना या सणाचं महत्त्वंच माहीत नसतं. संक्रांत म्हणजे काय? आणि या संक्रांतीला 'मकर संक्रांत' असं का म्हणतात.

(Image Credit : timesofindia.indiatimes.com)

संक्रांत म्हणजे संक्रमण, मार्ग क्रमून जाणे किंवा ओलांडून जाणे. तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. चला तर मग या मकरसंक्रांतीला आपल्या जवळच्या लोकांना मेसेज, शुभेच्छा देऊन हा सण साजरा करा.

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

(Image Credit : jagran.com)

कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गगनात उंच उडता पतंग
संथ हवेची त्याला साथ
मैत्रीचा हा नाजूक बंध
नाते अपुले राहो अखंड
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला!  

(Image Credit : bhaskar.com)

तुम्हांला व तुमच्या परिवाराला
नवचैतन्य, सुख, शांती, प्रेम
घेऊन येवो हीच  आमची कामना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

(Image Credit : ghpmumbai.com)

एक तिळ रुसला , फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे 
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांती!

(Image Credit : livehindustan.com)

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

Web Title: Makar Sankranti 2020 : Facebook, Whatsapp messages to wish your family and friends on occasion of Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.