बापरे! बाटलीत पेट्रोल दिलं नाही; म्हणून रागात महिलेच्या अंगावर सोडले साप, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 03:13 PM2020-07-14T15:13:10+5:302020-07-14T15:14:52+5:30

ही घटना सीसी टिव्हीत कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Maharashtra buldana angry man released snakes in petrol pump office cctv video goes viral 2 | बापरे! बाटलीत पेट्रोल दिलं नाही; म्हणून रागात महिलेच्या अंगावर सोडले साप, व्हिडीओ व्हायरल

बापरे! बाटलीत पेट्रोल दिलं नाही; म्हणून रागात महिलेच्या अंगावर सोडले साप, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. बुलढाण्यातील एका माणसाने पेट्रोल पंपवाल्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या अंगावर तीन  साप सोडले आहेत. अंगावर साप सोडण्यामागचं कारण वाचून तुम्ही अवाक् व्हाल. पेट्रोलपंपवर असलेल्या माणसाने त्या व्यक्तीला बॉटलमध्ये पेट्रोल भरून देण्यास नकार दिल्यामुळे त्याने हा विचित्र प्रकार केला आहे. ही घटना सीसी टिव्हीत कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

या सीसी टीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता पेट्रोल पंपच्या दरवाज्यावर येऊन एका कागदातून साप बाहेर काढतो आणि कार्यालयात सोडतो. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक पळण्यासाठी प्रयत्न करतात. एकूण तीन साप या कार्यालयात सोडण्यात आले होते. त्यापैकी २ कोब्रा तर १ धानम जातीचा साप असल्याची माहिती मिळत आहे. बाटलीत पेट्रोल न दिल्यामुळे पेट्रोस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला राग अनावर झाला.

त्यानंतर त्याने थेट पेट्रोल पंपा शेजारचं कार्यालय गाठलं.  या कार्यालयात एक महिला बसली होती. साप  सोडल्यानंतर ही महिला बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू लागली आहे.  दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेच्या काहीवेळानंतर साप पकडणाऱ्या बोलावण्यात आलं. त्यानंतर बराचवेळाने तेथिल स्थिती आटोक्यात आली. सापाला पाहून कार्यालयात बसलेल्या महिलेचा थरकाप उडाला होता. 

क्यों हिला डाला ना? रशियाने लस तयार केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा धुमाकूळ

वाह, कमाल! फोटोग्राफरनं उभा केला कॅमेराचा बंगला; एका मुलाचं नाव ठेवलं Cannon तर दुसऱ्याचं...

Web Title: Maharashtra buldana angry man released snakes in petrol pump office cctv video goes viral 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.