अरे व्वा! अवघ्या ३ मिनिटांत कार होते विमान अन् हवेत घेतंय उड्डाण, पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 02:55 PM2020-10-30T14:55:19+5:302020-10-30T14:59:33+5:30

सध्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या एअर कारचे वजन १ हजार १०० किलो आहे. २०० किलो अतिरिक्त भार ही कार उचलू शकते. 

kleinvision flying car transforms from road vehicle into air vehicle in less than 3 minutes wacth video | अरे व्वा! अवघ्या ३ मिनिटांत कार होते विमान अन् हवेत घेतंय उड्डाण, पाहा भन्नाट व्हिडीओ

अरे व्वा! अवघ्या ३ मिनिटांत कार होते विमान अन् हवेत घेतंय उड्डाण, पाहा भन्नाट व्हिडीओ

Next

फ्लाइंग कार विकसित करण्यासाठी स्लोवाकियाची एक कंपनी गेल्या ३० वर्षांपासून  भरपूर मेहनत करत आहे. मेट्रो न्यूजने दिलेल्या एका रिपोर्टनुसार आता क्लेनविजन (KleinVision) कंपनीने आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अनुसंधान आणि विकास फर्म यांच्या  फ्लाईंग कारने यशस्वीरित्या आपली चाचणी पूर्ण केली आहे. ही कार जमिनीवर चालत असतानाच  विमानाप्रमाणे आकार घेत आकाशात  झेप घेते. सध्या या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या  एअर कारचे वजन १ हजार १०० किलो आहे. २०० किलो अतिरिक्त भार ही कार उचलू शकते. 

क्लेव्हिजनने आपल्या फ्यूचरिस्टीक वाहनाचा एक व्हिडीओ शेअर करत  लिहिले आहे की, "क्लेनविज़न कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेली फ्लाईंग कार ३ मिनिटांपेक्षा कमी वेळात विमानात बदलू शकते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,  कारचे विमानात रुपांतर व्हायच्या आधीच रस्त्यावरून धावत आहे. ७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका व्यक्तीने खूप प्रभावशाली विमान कार असल्याचेही म्हटले आहे. प्राध्यापक क्लेन यांच्या टीमला युजरने शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. ६ महिन्यांनी ही कार बाजारात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.  जमिनीसह हवेतसुद्धा ही कार उड्डान घेऊ शकते. खरं की काय? ....म्हणे 'इथं' फक्त ८६ रुपयांत होतेय घरांची विक्री; हे ठिकाण आहे तरी कुठे?

Web Title: kleinvision flying car transforms from road vehicle into air vehicle in less than 3 minutes wacth video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.