थरारक! नदीत सापाला पडकता पकडता मागून कोब्रानं केला हल्ला; अन् मग... पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 02:07 PM2021-01-13T14:07:05+5:302021-01-13T14:17:58+5:30

Trending Viral Video in Marathi : नदीत उतरून हा माणूस प्राण्यांना पडकण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी  अचानक कोब्राने मागून हल्ला चढवला.

karnataka reptile expert narrowly escapes being bitten by a cobra see vira video | थरारक! नदीत सापाला पडकता पकडता मागून कोब्रानं केला हल्ला; अन् मग... पाहा व्हिडीओ

थरारक! नदीत सापाला पडकता पकडता मागून कोब्रानं केला हल्ला; अन् मग... पाहा व्हिडीओ

Next

कर्नाटकातील एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोब्रा हा शांत आणि इतकाच जीवघेणा सापचा प्रकार आहे. या कोब्रानं (Cobra Attack Reptile Expert) सर्प तज्ज्ञावर हल्ला केला आहे. नदीत उतरून हा माणूस प्राण्यांना पडकण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी  अचानक कोब्राने मागून हल्ला चढवला. जेव्हा हा  कोब्रा पायाला बिलगू लागला तेव्हा लोकांनी या कोब्रावर नियंत्रण मिळवलं. 

ही थरारक घटना कर्नाटकातील शिवमोगामध्ये  घडली असून नदीत उतरून सर्पतज्ज्ञ प्राण्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी संधी साधत कोब्रानं हल्लाबोल केला. मागे उभ्या असलेल्या माणसानं त्याचे तोंड पकण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत तज्ज्ञ जमीनीवर खाली पडले होते. जर दुसरी व्यक्ती तिथं उपस्थित नसली असती तर क्रोबा यशस्वी झाला असता. दैव बलवत्तर म्हणून या दोघांनी मिळून कोब्रावर नियंत्रण मिळवले. 

बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख

वृत्तसंस्था एएनआयनं हा व्हिडीओ ट्विट करत संबंधित माहिती दिली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ८०  हजारापेक्षा जास्तवेळा पाहिला गेला असून २ हजारापेक्षा जास्त  लाईक्स आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. ट्विटरवर लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....
 

Web Title: karnataka reptile expert narrowly escapes being bitten by a cobra see vira video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.