चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! 'इथे' काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनी घेते तासाला १०६८ रूपये!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 11:57 AM2020-01-10T11:57:41+5:302020-01-10T12:17:12+5:30

कोणतीही व्यक्ती काम कमाई करण्यासाठी आणि त्यातून पोट भरण्यासाठी करते. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक काम करतात.

Job advertise goes viral one have to pay 15 dollar an hour to work for this company | चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! 'इथे' काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनी घेते तासाला १०६८ रूपये!

चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! 'इथे' काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच कंपनी घेते तासाला १०६८ रूपये!

Next

कोणतीही व्यक्ती काम कमाई करण्यासाठी आणि त्यातून पोट भरण्यासाठी करते. आपल्या आणि आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक काम करतात. पण जर तुम्हाला असं सांगितलं गेलं की, तुम्हाला कामाच्या बदल्यात पगार दिला जाणार नाही. उलट तुम्हालाच कंपनीला पैसे द्यावे लागतील तर....?

आता तुम्हीच काय कुणीही हेच म्हणेल की, असं कुठं असतं का राव? पण सध्या ना सोशल मीडियावर एका स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. हा जॉब ओपनिंगचा स्क्रीनशॉट असून हा थोडा जुना आहे, पण आता व्हायरल होत आहे. हा स्क्रीनशॉट एका जॉब सर्च वेबसाईटचा आहे. यात न्यूयॉर्कच्या एका कंपनीची जाहिरात आहेत. त्यांना एका डेटा एनालिस्टची गरज होती.

या इंटर्नशिपसाठीच्या जाहिरातीत आधीच माहिती देण्यात आली होती की, इथे काम करणाऱ्याला पैसे द्यावे लागतील. त्यात लिहिले आहे की, ही इंटर्नशिप एक रिव्हर्स फायनेश्ड इंटर्नशिप आहे आणि यासाठी तुम्ही इथे काम करण्यासाठी कंपनीला १५ डॉलर म्हणजेच १०६८ रूपये द्यावे लागतील.

@tjmcnab नावाच्या ट्विटर यूजरने हा स्क्रीनशॉट बुधवारी शेअर केला होता. त्यानंतर ८७.५ हजार यूजर्सनी याला लाइक केलं आणि २१.६ हजार यूजर्सनी हा फोटो रिट्विट केला. लोक नोकरीची ही जाहिरात पाहून हैराण झाली आहे. 

जॉब सर्च वेबसाइटने सुद्धा हे मान्य केलं की, अशाप्रकारची जाहिरात देण्यात आली होती. पण आता ही जाहिरात काढण्यात आली आहे. वेबसाइटने सांगितले की, ते या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. तर एका यूजरने सांगितले की, याआधीही अशा जाहिराती आल्या होत्या.


Web Title: Job advertise goes viral one have to pay 15 dollar an hour to work for this company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.