आईसक्रीमवाला करत होता प्रँक, चिमुकल्याने असा धडा शिकवला की पुन्हा हिम्मत करणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:16 PM2021-11-30T21:16:10+5:302021-11-30T21:31:03+5:30

एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आईस्क्रीम घेण्यासाठी गेलं होतं, पण आईस्क्रीमवाला त्याच्यासोबत प्रँक करायला लागला. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.

ice cream seller pranks with boy, kid gets angry and throw the cone | आईसक्रीमवाला करत होता प्रँक, चिमुकल्याने असा धडा शिकवला की पुन्हा हिम्मत करणार नाही...

आईसक्रीमवाला करत होता प्रँक, चिमुकल्याने असा धडा शिकवला की पुन्हा हिम्मत करणार नाही...

Next

कधीकधी आईस्क्रीमशी संबंधित व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूपच मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मूल आईस्क्रीम घेण्यासाठी गेलं होतं, पण आईस्क्रीमवाला त्याच्यासोबत प्रँक करायला लागला. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईस्क्रीमच्या दुकानासमोर एक लहान मुल उभे आहे, तेव्हा पलीकडून आईस्क्रीमवाले तुर्की शैलीत युक्ती करत आईस्क्रीम मुलाकडे देत आहे. पण जेव्हा मुलाने आईस्क्रीम घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा आईस्क्रीमवाला आईस्क्रीम अचानक मागे खेचतो आणि मुलाच्या हातात फक्त आईस्क्रीम कोन उरतो. आईस्क्रीम प्रँक करणार्‍या व्यक्तीच्या या कृतीने मुलाला राग येतो आणि तो लगेचच रागाच्या भरात, आयस्क्रिम कोन जमिनीवर आपटतो आणि त्याच्या पायाने चिरडतो. लहान मुलाचा हा गोंडस व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.

हा गोंडस छोटा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आहे हे माहीत नाही, मात्र तो इन्स्टाग्रामवर cute_baby_reel या नावाने शेअर करण्यात आला असून, ‘पुन्हा जोक करू नकोस’ असं लिहिले आहे. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, आतापर्यंत २ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर १४ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

Web Title: ice cream seller pranks with boy, kid gets angry and throw the cone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.