This is how greece pm take vaccine netizens are gone crazy | पंतप्रधानांनी थेट शर्ट काढूनच टोचून घेतली कोरोना लस; अन् फोटो झाला व्हायरल, लोक म्हणाले.....

पंतप्रधानांनी थेट शर्ट काढूनच टोचून घेतली कोरोना लस; अन् फोटो झाला व्हायरल, लोक म्हणाले.....

जगभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. भारतातही अनेक आठवड्यांपासून लसीकरण अभियानाला सुरूवात झाली आहे.  देशातील अनेक तज्ज्ञ, प्रतिष्ठीत व्यक्ती लसीकरणाला उपस्थित राहिल्यामुळे सामान्याच्या मनातही लसीकरणाबबत सकारात्मक दृष्टीकोन तयार झालेला पाहायला मिळत आहे. दरम्यान  ग्रीकचे प्रधानमंत्री Kyriakos Mitsotakis  हे कोरोनाच्या लसीमुळे चर्चेत आहेत. 

सध्या Kyriakos Mitsotakis  त्यांच्या लसीकरणामुळे बरेच चर्चेत आहेत. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःला लस टोचून घेतली ते पाहता लोकांमध्ये चर्चेला  सुरूवात झाली आहे. खुद्द पंतप्रधानांनीचकोरोनाची लस शर्ट काढून टोचून  घेतल्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्या या स्टाईलची फॅन झाली आहे. त्यांनी एटीकोनच्या रुग्णालयात कोरोनाची दुसरी लस टोचून घेतली. यावेळी त्यांनी लस टोचण्यास सोपं जावं म्हणून शर्टाची बटन  खोलून डाव्या हातावर लस टोचून घेतली आहे. 

त्यांचा लस टोचून घेण्याचा व्हिडीओ समोर आला असून लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लोकांना पंतप्रधानांची ही स्टाईल खूप आवडली आहे. लोकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत  ९ लाख ९९ हजार  ६५ लोकांचे लसीकरण झाले आहे. आई ती आईच! समोर आला माय लेकाच्या भेटीचा अनोखा व्हिडीओ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

गुरूवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास ९२ हजार  ५८१ लोकांना लस देण्यात आली होती. यादरम्यान देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेटसुद्धा ९६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन कोटी  ६५ हजारांपेक्षा अधिक लोक कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: This is how greece pm take vaccine netizens are gone crazy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.