व्वा रे जिगरबाज! जीवाची पर्वा न करता त्याने केली नदी पार, व्हिडीओ पाहाल तर चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:42 PM2021-07-23T14:42:04+5:302021-07-23T16:14:54+5:30

एक व्यक्ती नदी पार करण्यासाठी जीवाची बाजी लावतो. फक्त एका पातळ रश्शीच्या साह्य्याने तो दुथडी भरुन वाहणारी नदी पार करून जातो....

He crossed the River risking his life, if you watch the video, you will go crazy ... | व्वा रे जिगरबाज! जीवाची पर्वा न करता त्याने केली नदी पार, व्हिडीओ पाहाल तर चक्रावून जाल...

व्वा रे जिगरबाज! जीवाची पर्वा न करता त्याने केली नदी पार, व्हिडीओ पाहाल तर चक्रावून जाल...

Next

सोशल मिडिया (social media) प्लॅटफॉर्म म्हटलं की अनेक प्रकारचे व्हिडिओ त्यावर व्हायरल होत असतात. असे काही व्हिडिओ असतात. यात काही खतरनाक (dangerous) व्हिडिओही पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडिया साईटवर व्हायरल (viral video) होतोय. त्यात एक व्यक्ती नदी पार करण्यासाठी जीवाची बाजी लावतो. फक्त एका पातळ रश्शीच्या साह्य्याने तो दुथडी भरुन वाहणारी नदी पार करून जातो. 

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की सुरुवातीला एका व्यक्तीच्या मदतीने तो त्याच्या कमरेला रश्शी बांधतो. नंतर त्या रशीवर उलटे लटकून तो हळू हळू अत्यंत सावध पद्धतीने नदी पार करतो. 

जरा जरी त्याचा हात सटकला असता किंवा एखादी चूक झाली असते तर तो नदीमध्ये पुरता वाहून गेला असता. पण कौशल्याने तो नदी पार करून पुढच्या तीरावर निघुनही गेला.

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ज्याने कुणी हा व्हिडिओ पाहिला तो एकतर या व्यक्तीच्या धैर्याच कौतूक करतोय किंवा चक्रावून तरी जातोय.
खरंच काही लोक अशी असतात की ती एखादी समस्य आली तर डोक्याला हात लावून बसतात तर काही लोक स्वत:च्या प्राणांची बाजी लावून त्या समस्येवर मात करतात.
 

Web Title: He crossed the River risking his life, if you watch the video, you will go crazy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.