तरूणीने घरीच प्रिंटरवर छापल्या नोटा, नंतर Audi घेण्यासाठी शोरूममध्ये गेली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:11 AM2019-07-23T11:11:38+5:302019-07-23T11:17:30+5:30

लहान असताना बहुतेक सगळ्यांनीच हा विचार केला असेल की, हाती एखादी एक नोटा छापण्याची मशीन लागावी. आणि वाट्टेल तेवढ्या नोटा छापाव्या.

Girl Tries To Buy Audi Worth Rs 11 Lakhs With Money She Printed At Home | तरूणीने घरीच प्रिंटरवर छापल्या नोटा, नंतर Audi घेण्यासाठी शोरूममध्ये गेली आणि....

तरूणीने घरीच प्रिंटरवर छापल्या नोटा, नंतर Audi घेण्यासाठी शोरूममध्ये गेली आणि....

googlenewsNext

लहान असताना बहुतेक सगळ्यांनीच हा विचार केला असेल की, हाती एखादी एक नोटा छापण्याची मशीन लागावी. आणि वाट्टेल तेवढ्या नोटा छापाव्या. असाच काहीसा विचार जर्मनीतील एका २० वर्षीय तरूणीने केला आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाली. या तरूणीने घरीच प्रिंटरवर नोटा छापल्या आणि गेली Audi कार खरेदी करायला.

indiatimes.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, Kaiserslautern ला राहणाऱ्या या मुलीने गेल्या सोमवारी एका कारच्या शोरूममध्ये जाऊन Audi A3 ही आलिशान कार पाहिली. गाडीची माहिती घेतली. इतकेच काय तर तिने या कारची टेस्ट ड्राइव्ह सुद्धा घेतली. या कारची किंमत ११ लाखांच्या आसपास होती. तिने डील डन केली.

नंतर या मुलीने डीलर घरी प्रिंटरवर छापलेल्या नोटा दिल्या. झालं इथेच ती पकडली गेली. कर्मचाऱ्यांना या नकली नोटा ओळखण्यास जराही वेळ लागला नाही. त्यांनी पोलिसांना मुलीचा हा कारनामा सांगितला आणि मुलीवर गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी या मुलीच्या घरी तपासणी केली. तेव्हा त्यांना प्रिंटरमधून काढलेले १३०० यूरोच्या नोटाही मिळाल्या. भारतीय करन्सीनुसार, ही रक्कम १० लाखांच्या आसपास आहे. जर्मनीच्या कायद्यानुसार, या मुलीला एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते.

Web Title: Girl Tries To Buy Audi Worth Rs 11 Lakhs With Money She Printed At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.