कोंबडी चोरासाठी लावलेल्या सापळ्यात अकडला ५० फूट लांब साप; मग... पाहा व्हिडीओ

By Manali.bagul | Published: November 22, 2020 02:50 PM2020-11-22T14:50:11+5:302020-11-22T15:22:41+5:30

Viral Video in Marathi : कोंबड्यांची शिकार करणाऱ्यासाठी ठेवलेल्या एका सापळ्यामध्ये अ‍ॅनाकोंडा अडकला आहे.

Giant snake of 50 feet stuck in big drum eyes opened wide see video | कोंबडी चोरासाठी लावलेल्या सापळ्यात अकडला ५० फूट लांब साप; मग... पाहा व्हिडीओ

कोंबडी चोरासाठी लावलेल्या सापळ्यात अकडला ५० फूट लांब साप; मग... पाहा व्हिडीओ

googlenewsNext

सोशल मीडियावर अ‍ॅनाकोंडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोंबड्यांची शिकार करणाऱ्यासाठी ठेवलेल्या एका सापळ्यामध्ये  अ‍ॅनाकोंडा अडकला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता  कोंबड्या पकडणाऱ्यासाठी सापळा लावण्यात आला असून अ‍ॅनाकोंडा त्यामध्ये अडकला आहे. हा अ‍ॅनाकोंडा तब्बल ५० फुटांचा असून या ड्रममधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहे.  हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

कोंबडी चोराला पकडण्यासाठी हा सापळा लावल्याचं कॅप्शनमध्ये युझरनं व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मोठा अ‍ॅनाकोंडा चिखलाच्या तलावाच्या काठावर निळ्या रंगाच्या ड्रममध्ये अडकलेला दिसत आहे. बाहेर येण्यासाठी धडपड  करत आहे. अ‍ॅनाकोंडाचा हा व्हिडीओ खरा नसून एडीट केला आहे. असं अनेकांचे म्हणणे आहे. हा अ‍ॅनाकोंडा नसून लहानश्या सापाला एडीट करून मोठा बनवलं आहे. अशीसुद्धा चर्चा सुरू आहे. आतापर्यंत  लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. 

नदीत पोहोताना दिसला तब्बल ५० फुटांचा अ‍ॅनाकोंडा

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी नदीत पोहोत असलेल्या एनाकोंडाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं दिलेल्या कॅप्शननुसार हा अ‍ॅनाकोंडा 50 फूटाहून अधिक लांब आहे आणि तो नदी अगदी सहजपणे पार करून जात आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे की? यााबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ 7 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक भलामोठा अ‍ॅनाकोंडा नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जात आहे. लय भारी! मराठमोळ्या दाम्पत्याने ६५ वर्षांनी पुन्हा लग्न केलं; पाहा झक्कास व्हिडीओ

या अ‍ॅनाकोंडाची लांबी 50 फुट किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात होते.  फॅक्ट-चेकिंग वेबसाइट दॅट्स नॉनसेंसने दिलेल्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पर "जायंट एनाकोंडा क्रॉसिंग द रोड" या अंतर्गत हा व्हिडीओ ठिकाणाचे नाव न देता अपलोड करण्यात आला होता.  या व्हिडीओला इफेक्ट देण्यात आल्याचा दावा काही युझर्सनी केला. सापाला मोठं दाखवण्यासाठी या व्हिडीओमध्ये बदल करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला होता.  ५० फूट खोल विहिरीत पडलं हत्तीचं पिल्लू; अन् शेतकऱ्याला आवाज येताच सुरू झालं रेस्क्यू; पाहा फोटो

Web Title: Giant snake of 50 feet stuck in big drum eyes opened wide see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.