सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल आणि एका रात्रीत ती इंटरनेट सेन्सेशन झाली. काही दिवसांपूर्वी अशीच एक गोष्ट व्हायरल झाली होती, ती म्हणजे JCBKiKhudai.अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर फार कमी वेळात व्हायरल झाला होता. विसरलात की काय? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम सगळीकडे जेसीबी मशीनवर असलेले मीम्स आणि जोक्स व्हायरल झाले होते. असं सांगण्यात येतं की, या प्रकरणाती सुरुवात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्यापासून झाली होती. 

खरं तर अभिनेत्री सनी लिओनीने जेसीबी मशीनच्या टायरवर चढून फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही क्षणातच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. या हॅशटॅग वापरून अनेक मीम्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. पण तुम्हाला माहीत आहे का? आता जेसीबीशी संबंधित आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये जेसीबी चक्क नागीण डान्स करताना दिसत आहेत. तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता? असं कसं शक्य आहे? तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहा... 

पाहा व्हिडीओ : 


दरम्यान या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, जेसीबीचा नागिण डान्स पाहून स्वतः नागिणंही हैराण होईल... 


आणखी एका यूजरने असं म्हटलं आहे की, हसून हसून माझ्या पोटात दुखू लागलं आहे... 


हा व्हिडीओ पाहणाऱ्या आणखी एका यूजरने असं लिहिलं आहे की, क्रिएटिव्हीटी म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हा व्हिडीओ पाहा... 


आतापर्यंत 40 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. दरम्यान #JCBKiKhudayi हा हॅशटॅग वापरून काही मीम्स व्हायरल झाले होते. पाहूयात काही मीम्स... 

Web Title: Funny video of jcb machines doing the nagin dance video goes viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.