FlashBack2019 : २०१९ मध्ये खाण्या-पिण्याचे हे पदार्थ पाहून सिंघमची सटकली अन् हीरा ठाकूरने केली उलटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 12:38 PM2019-12-31T12:38:44+5:302019-12-31T12:41:29+5:30

२०१९ मध्ये सोशल मीडियात हजारो गोष्टी गाजल्या आणि त्यावर चर्चा झाली. पण यातील काही खास गोष्टी लोक आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत.

FlashBack2019 : Bizarre food trends went viral on social media | FlashBack2019 : २०१९ मध्ये खाण्या-पिण्याचे हे पदार्थ पाहून सिंघमची सटकली अन् हीरा ठाकूरने केली उलटी!

FlashBack2019 : २०१९ मध्ये खाण्या-पिण्याचे हे पदार्थ पाहून सिंघमची सटकली अन् हीरा ठाकूरने केली उलटी!

Next

२०१९ मध्ये सोशल मीडियात हजारो गोष्टी गाजल्या आणि त्यावर चर्चा झाली. पण यातील काही खास गोष्टी लोक आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत. आता तुम्ही म्हणाल अशा कोणत्या गोष्टी आहेत. तर या आहेत काही विचित्र पदार्थांच्या डिश...२०१९ मध्ये विचित्र पदार्थांचा एक विचित्र ट्रेन्ड बघायला मिळाला. हे पदार्थ इतके विचित्र होते की, तुमची तर सटकेलच सोबतच सिंघमची पण सटकेल.

सप्टेंबरध्ये एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात व्हिडीओत महिला चक्क दुधात मॅगी तयार करण्याची रेसिपी सांगत होती. यात तिने गुलाबाच्या पाकळ्याही टाकल्या होत्या. ही रेसिपी पाहून लोकांना सूर्यंवंशममधील हीरा ठाकूरच्या उलटीची आठवण झाली.
मग काय दूध-मॅगीनंतर एकापेक्षा एक टुकार रेसिपी समोर येऊ लागल्या. त्यानंतर समोर संत्रा मॅगी चर्चेत आली होती.

अनेक भाज्या तुम्ही खाल्ल्या किंवा पाहिल्या असतील. पण कधी गुलाबजामची भाजी खाल्ली का? नक्कीच खाल्ली नसेल. पण अशाही एका भाजीचा फोटो एकाने सोशल मीडियात शेअर केला होता. 

त्याहून पलिकडे जाऊन एका वडापावसारखा गुलाबजाम पाव सुद्धा खाल्ला. नुसता खाल्ला नाही तर त्याचा फोटोही शेअर केला. हे पाहून वडापाव प्रेमींची चांगलीच सटकली होती.

आता मला सांगा काजू कतली जर अशी टोमॅटो सॉससोबत खाल्ली तर बच्चे जान नही जायेगी तो क्या होगा भाई...

डोसा किती चांगला पदार्थ आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण चॉकलेट डोसा खावा लागला तर कसं व्हायचं?

कुरकुरे आणि दूध...असं कुठं असतं का राव?

सकाळच्या नाश्त्यात इडली आणि सांबर खाणं पसंत करतात. पण हा महान व्हिडीओ पाहिल्यावर इडली आणि चहा दोन्हींवरून तुमचं मन उठेल.


Web Title: FlashBack2019 : Bizarre food trends went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.