कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 04:06 PM2020-07-11T16:06:29+5:302020-07-11T16:11:03+5:30

पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली आणि जनावरांना खाऊ पिऊ घातले आहे.

Farmers in the hospital because of corona the police reached for the animals at madha maharashtra | कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे शेतकरी रुग्णालयात; मुक्या जीवांसाठी खाकीतला देवमाणूस पोहोचला गोठ्यात; पाहा व्हिडीओ

Next

कोरोना व्हायरसच्या या माहामारीत  कधीही न अनुभवलेल्या कठीण परिस्थितीचा सामना सगळ्यांनाच करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवर कोरोनाच्या  संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. टेंभुर्णी गावातील एका  शेतकऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या वडील व पत्नी यांनाही शासकीय यंत्रणेने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले होते. याशिवाय घरात इतर माणूस नसल्याने जनावारांच्या खाण्यापिण्याची काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला होता. 

तुमचा विश्वास बसणार नाही पण अशावेळी टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकी दाखवत शेतातील जनावरे, शेळ्या यांची चारापाण्याची सोय केली आणि जनावरांना खाऊ पिऊ घातले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसंच टेंभुर्णी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

माढा तालुक्यातील अकोले ( बु) येथील एका व्यक्तीचा अकलूज येथिल रुग्णालयात उपचार घेताना कोरोनी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या व्यक्तीवर पुणे येथे उपचार चालू होते. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली. त्यानुसार या कुटंबालाही आरोग्य आणि प्रशासकीय  यंत्रणेनं कोरोना चाचणी करण्यासाठी कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयलात भरती केलं.

अशा स्थितीत कोरोनाच्या भीतीने कोणीही व्यक्ती या कुटुंबाच्या घरी जायला तयार नव्हते. तेव्हा जनावरांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून माणूसकी दाखवत पोलिसांनी या कुटुंबियांच्या गोठ्यातील प्राण्यांच्या चारा पाण्याची सोय करून जनावरांची भूक भागवली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे

वाह! रिक्षावाल्याची करामत पाहून आनंद महिंद्रा झाले इंप्रेस; अन् म्हणाले...., पाहा व्हिडीओ

भारीच! मराठमोळ्या महिलेची शेती; माती न वापरताच उगवतात भाजी पाला, टेक्निक पाहून चकित व्हाल

Web Title: Farmers in the hospital because of corona the police reached for the animals at madha maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.