Fact Check : इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींचा भाजी विकतानाचा PHOTO VIRAL; जाणून घ्या यामागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 02:25 PM2020-09-14T14:25:41+5:302021-01-27T14:26:44+5:30

सुधा मूर्ती आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख इतकीच नाही

Fact Check : Photo of sudha murthy who build infosys selling vegetables goes viral | Fact Check : इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींचा भाजी विकतानाचा PHOTO VIRAL; जाणून घ्या यामागचं सत्य

Fact Check : इन्फोसिस उभारणाऱ्या सुधा मूर्तींचा भाजी विकतानाचा PHOTO VIRAL; जाणून घ्या यामागचं सत्य

googlenewsNext

(Image Credit- newsmeter.in) 

आदर्श आणि लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत सुधा मुर्ती यांचे नाव सर्वांनाच माहितीचे आहे. सध्या सोशल मीडियावर सुधा मुर्ती यांचं नाव आणि फोटो चांगलाच ट्रेंड होत आहे.  या फोटोत सुधा मुर्ती भाज्या विकत असताना दिसत आहेत. सुधा मूर्ती आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख इतकीच नाही, ही कंपनी उभी करण्यासाठी सुधा मुर्तींनी  प्रयत्नांची पराकाष्ठा पार केली होती. सुधामुर्ती लेखिकाही आहेत. सुधा मुर्तींची आतापर्यंत 92 पुस्तकं साधारणपणे सर्व भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध आहेत.

सोशल मीडियावर सुधा मुर्तींचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत ते एका भाज्यांच्या दुकानात बसले आहेत.  या पोस्टवर सोशल मीडिया युजरनं कमेंट केली आहे की, कोटींची मालकीण असतानाही इतकं साधं आयुष्य जगणं सोपं नाही. मात्र सुधा मुर्ती यांचं व्यक्तित्वही असंच आहे. साधेपणाचं दुसरं नाव सुधा मुर्ती आहे. 

सुधा मुर्ती या सुरूवातीला TELCO कंपनीत इंजीनियरिंग काम करीत होत्या. त्यावेळी मुर्ती या पुण्यातल्या टेल्कोमध्ये काम करत असलेल्या एकमात्र महिला होत्या. टेल्को कंपनीत नोकरी मिळण्याचीदेखील एक वेगळीच कथा आहे. लग्नापूर्वी त्याचं नाव सुधा कुलकर्णी होतं. त्यानंतर नारायण मुर्ती यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव सुधा मुर्ती झालं. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्वत: ही गोष्ट सांगितली होती.

फॅक्ट चेक

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असताना एक मेसेज सुद्धा व्हायरल होत होता. या फोटोमधील स्त्री या सुधा मूर्ती असून आयटी सेक्टरच्या सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहे. सुधा मुर्ती यांनी राघवेंद्र देवळाच्याआराधना उत्सवात दरवर्षीप्रमाणेच सहभागी झाल्या होत्या.  त्या ठिकाणचा हा फोटो आहे. अनेकदा सुधा मुर्ती या  या देवळात सेवेसाठी कार्यरत असतात.  व्हायरल झालेला फोटो हा  Kannada edition of Oneindia.com कडून प्रकाशित करण्यात आला होता.  अनेका यु ट्यूब चॅनेल्सनी आराधना उत्सवात भाजी विकत असल्याचा दावा केला होता. हा दावा चुकीचा असून  सुधा मुर्ती या उत्सवाच्यावेळी अनेकदा स्टोरेजची व्यवस्था सांभाळण्याचे कार्य करतात. 

हे पण वाचा-

Video : मास्क न घातला हंसाजवळ गेली अन् हंसाने रागात 'या' महिलेसोबत केलं असं काही...

पोलीस उपनिरीक्षक शांतप्पा दररोज शिकवितात मजुरांच्या मुलांना

Web Title: Fact Check : Photo of sudha murthy who build infosys selling vegetables goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.