अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...

By manali.bagul | Published: January 4, 2021 05:48 PM2021-01-04T17:48:23+5:302021-01-04T18:07:52+5:30

Emotional Stories in Marathi: ऑक्टोबरमध्ये या दोघींना रुग्णालयात आणण्यात आलं  होतं. संक्रमणाची तीव्रता वाढल्यानं आईने जगाचा निरोप घेतला. 

Emotional Stories in Marathi: Daughter says final goodbye to mum news goes viral | अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...

अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...

Next

(Pictures Source: Humans of Covid-19)

कोरोनाकाळात अशा अनेक घटना समोर आल्या ज्यामुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले. जीवघेण्या कोरोनामुळे अनेकांनी जगाचा निरोप घेतला. तर कोरोना  काळात अनेक नात्यांमध्ये दुरावा आला. अशीच एक घटना सध्या समोर येत आहे. आई आणि मुलगी  या दोघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. या  माय लेकींची शेवटची भेट सुद्धा रुग्णालयातच झाली होती. दोघींना एकत्र एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑक्टोबरमध्ये या दोघींना रुग्णालयात आणण्यात आलं  होतं. संक्रमणाची तीव्रता वाढल्यानं आईने जगाचा निरोप घेतला. 

आई फक्त काही दिवस जीवंत राहू शकते असं डॉक्टरांनी मुलीला सांगितलं होतं. मुलगी एनाबेल शर्मा हिच  वय ४९ वर्ष आहे.  एनाबेल यांना सांगण्यात आलं होतं की, तुमच्या आईची स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे कधीही जीव जाण्याची शक्यता आहे. Leicester Royal Infirmary, इंग्लँडमध्ये या दोघींचा फोटो काढण्यात आला होता.  या फोटोत तुम्ही पाहू शकता या मायलेकी  एकाच  खोलीतील जवळ जवळ असलेल्या बेडवर असून मुलीनं आईचा हात हातात घेतला आहे. हा फोटो काढल्यानंतर  २४ तासांनी एनाबेलाच्या आईच्या मृत्यू झाला. 

याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण

मेट्रो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार एनाबेला यांनी सांगितले की, '' आईला काय होतंय हे मला कळलंच नाही. कारण तोंडावर मास्क लावला होता.  याशिवाय एक पारदर्शी हेलमेटसुद्धा लावण्यात आलं होतं.''  एनाबेला यांच्या आईनं ने Do Not Resuscitate Order सुद्धा साईन केलं होतं. ज्यात रुग्णाचे  कोणतेही उपचार केले जात नाहीत. तर नैसर्गिकरित्या मरणासाठी सोडून दिलं जातं. 

बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ

एनाबेला यांच्या आईला अस्थमाचा सुद्धा त्रास होता. स्थिती खराब असल्यामुळे आयसीयूमध्ये राहावं लागलं होता. आईच्या मृत्यूनंतर  त्यांना अंत्यसंस्कराची क्रिया स्क्रिनवर पाहावी लागली. त्यांनी आपली गोष्ट Humans Of Covid 19 या फेसबूकपेजवर शेअर केली आहे.  कोरोनाच्या प्रसाराबाबत ते लोकांमध्ये जनजागृती पसरवत आहेत. 

Web Title: Emotional Stories in Marathi: Daughter says final goodbye to mum news goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.