कमाल! AI ने वाचवला व्यक्तीचा जीव; डॉक्टरांनी घरी पाठवलं, पण Grok ने ओळखला जीवघेणा आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 12:10 IST2025-12-07T12:09:39+5:302025-12-07T12:10:41+5:30
एआयने चक्क एका माणसाचा जीव वाचवला आहे.

फोटो - AI
AI चा वापर जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आता एआयने चक्क एका माणसाचा जीव वाचवला आहे. एलॉन मस्कची कंपनी, xAI मधील ग्रोक चॅटबॉट संदर्भातील ही घटना आहे. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये एआयने एका व्यक्तीचा जीव वाचवल्याचा दावा करण्यात आला आहे.
४९ वर्षीय युजरने त्याचा अनुभव शेअर केला आणि स्पष्ट केलं की जेव्हा त्याला पोटदुखीचा खूप त्रास झाला तेव्हा तो डॉक्टरकडे गेला. त्याने त्याची वेदना सांगितली पण डॉक्टरांनी गॅसमुळे दुखत असल्याचं निदान केलं आणि काही औषध देऊन त्याला घरी पाठवलं.
औषध घेतल्यानंतरही व्यक्तीला आराम मिळाला नाही. त्यानंतर त्याने ग्रोक एआयला त्याच्या समस्येबद्दल सांगितलं. ग्रोक एआयने रिप्लाय दिला की ही सामान्य वेदना नाही. एआयने सल्ला दिला की अपेंडिक्स छिद्र किंवा फुटलेला असू शकतो, म्हणून त्याने ताबडतोब रुग्णालयात जाऊन सीटी स्कॅन करावं.
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
रुग्णालयात जाऊन व्यक्तीने सांगितलं की त्याचा त्रास वाढला आहे. त्यानंतर त्याने डॉक्टरांना सीटी स्कॅन करण्यास सांगितलं. सीटी स्कॅनमध्ये त्याच्या अपेंडिक्समध्ये सूज असल्याचे दिसून आलं आणि तो फुटण्याच्या मार्गावर होता. त्यानंतर अपेंडिक्स सर्जरी करून काढून टाकण्यात आलं.
ऑपरेशननंतर तो नियमित तपासणीसाठी रुग्णालयात परतला तेव्हा त्याने डॉक्टरांना सांगितलं नाही की त्याने ग्रोक एआयचा सल्ला घेतला आहे. एआय-चालित चॅटबॉट्स अद्याप डॉक्टरची जागा घेण्यास सक्षम नाहीत, तरीही बरेच लोक एआय चॅटबॉट्सकडून औषधे, नातेसंबंध सल्ला आणि इतर सेवा घेतात. मात्र हे चुकीचं आहे आणि ते धोकादायक ठरू शकतं.