लोकांचा 'हा' गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क ६ मास्क एकाचवेळी लावले, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 05:17 PM2020-07-16T17:17:59+5:302020-07-16T17:18:15+5:30

कोरोनाच्या माहामारीत विषाणूंसोबत जगत असताना मास्कचा वापर हा खूप महत्वाचा समजला जात आहे. मास्कचा वापर कोरोना काळात शस्त्राप्रमाणे केला ...

Doctor wears six face masks at once to debunk a anti mask myth | लोकांचा 'हा' गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क ६ मास्क एकाचवेळी लावले, पाहा व्हिडीओ

लोकांचा 'हा' गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क ६ मास्क एकाचवेळी लावले, पाहा व्हिडीओ

Next

कोरोनाच्या माहामारीत विषाणूंसोबत जगत असताना मास्कचा वापर हा खूप महत्वाचा समजला जात आहे. मास्कचा वापर कोरोना काळात शस्त्राप्रमाणे केला जात आहे. शिंकल्यातून किंवा खोकण्याातून बोलण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्समुळे होणारा संसर्ग मास्कच्या वापरामुळे रोखता येऊ शकतो. पण मास्कच्या वापराची सवय नसल्यामुळे लोकांना मास्क वापल्यानंतर गुदमरतं किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. अशा अनेक तक्रारी केल्या जात होत्या.  एका रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार मास्कच्या वापराने ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो.

सध्या सोशल मीडियावर एका डॉक्टरचा व्हिडीयो तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून मास्कच्या वापरामुळे ऑक्सनजनची कमतरता भासत नाही असे या डॉक्टरांना सांगायचं आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @DrZeroCraic यांनी शेअर केला आहे. मास्क वापरल्यानंतर ऑक्सिजनचा स्तर कमी होतो का?असा सवास त्यांनी उपस्थित केला आहे. ''तोंड झाकण्यासाठी लावलेल्या मास्कने कोणत्याही प्रकारे ऑक्सिजनचा स्तर कमी होत नाही. मी  ६ मास्क लावले आहेत. तरीही माझ्या शरीरातील ऑक्सिजनचा स्तर कमी झालेला नाही.''

तुम्ही व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता १७ सेकंदात या डॉक्टरने एकावर  एक ६ मास्क लावले आहेत. या डॉक्टरच्या बाजूला जे मशीन आहे त्याद्वारे ऑक्सिजनचा स्तर मोजता येऊ शकतो. मास्क लावल्यानंतर डॉक्टरच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल  ९८ ते ९९ च्या मध्ये होती. हे डॉक्टर आयलँडच्या डबलिनचे असल्याचे समजते.या व्हिडीयोला आतापर्यंत ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.

उद्योगपतीला सापडला दुर्मिळ कासव, याला मानलं जातं गुडलक चार्म!

शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

Web Title: Doctor wears six face masks at once to debunk a anti mask myth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.