'मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने वॅक्सीन घेतल्यावर पत्नीने डॉक्टर पतीची घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 09:04 AM2021-01-28T09:04:53+5:302021-01-28T09:05:23+5:30

एकटेच कोरोना वॅक्सीन घेऊन आल्यानंतर डॉक्टर केके अग्रवाल यांनी लाइव्ह सेशन दरम्यान पत्नीचा फोन उचलून चूक केली.

Doctor kk Aggarwal got vaccinated without wife whatever happened after this gone viral on social media | 'मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने वॅक्सीन घेतल्यावर पत्नीने डॉक्टर पतीची घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल...

'मला सोबत का नेलं नाही?' एकट्याने वॅक्सीन घेतल्यावर पत्नीने डॉक्टर पतीची घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल...

Next

प्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष केके अग्रवाल यांनी पत्नी विना कोरोना वॅक्सीन घेतल्याची चूक केली आणि त्यानंतर जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय. डॉक्टर अग्रवाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांची पत्नी त्यांची वॅक्सीनवरून शाळा घेत असल्याचे ऐकायला मिळते.  

एकटेच कोरोना वॅक्सीन घेऊन आल्यानंतर डॉक्टर केके अग्रवाल यांनी लाइव्ह सेशन दरम्यान पत्नीचा फोन उचलून चूक केली. दरम्यान पत्नी जे काही म्हणाली ते लाइव्ह सेशनमध्ये रेकॉर्ड झालं आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता  की, डॉक्टर अग्रवाल हे कारमध्ये बसले आहेत आणि ते लाइव्ह सेशनमध्ये आहेत. तेव्हाच त्यांच्या पत्नीचा फोन येतो आणि त्या विचारतात की, तुम्ही वॅक्सीन घ्यायला गेले होते का? यावर डॉक्टर सांगतात की, मी माहिती घ्यायला गेलो होतो, तर त्यांनी सांगितले आता कुणी नाही तर घ्या. म्हणून मी वॅक्सीन घेतली'.

डॉक्टरांनी इतकंच सांगितलं की, त्यांनी वॅक्सीन घेतली. हे ऐकताच त्यांच्या पत्नीचा पारा चढतो आणि त्या त्यांना विचारतात की, ते त्यांना सोबत नेऊ शकत नव्हते का? यावर डॉक्टर सांगतात की, त्यांना सोमवारी वॅक्सीन दिली जाईल. पण त्यांच्या पत्नीचा पारा आणखी चढतो. त्या म्हणतात की, 'फार विचित्र आहात तुम्ही, आम्हाला सोबत का घेऊन गेले नाहीत? तुम्ही मला तुमच्यासोबत का नेलं नाही?'.

समजावण्याचे सर्व प्रयत्न फेल

डॉक्टर अग्रवाल पुन्हा नाराज पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करतात की, मी फक्त माहिती घ्यायला गेलो होतो आणि त्यांनी वॅक्सीन देण्यात आली. यावर त्यांची पत्नी म्हणते की, 'कारणं नका सांगू, माझ्याशी खोटं बोलू नका'. तेव्हा डॉक्टरांना लक्षात येतं की ते लाइव्ह सेशनमध्ये आहेत. ते म्हणतात, 'मी लाइव्ह आहे. नंतर बोलतो'. यावर त्यांची पत्नी तिकडून उत्तर देते की, 'मी आताच लाइव्ह येऊन तुमची ऐशीतैशी करते'.

डॉक्टरांनी दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर केके अग्रवाल यांनी ट्विटर हॅंडलवर यासंबंधी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, मला माहीत आहे की, हा व्हिडीओ खूप पाहिला जातोय. यात दिसतं की, त्यांची पत्नी त्यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. त्यांनी लिहिले की, 'मला माहीत आहे माझा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मला आनंद आहे की, या कठीण काळात मी लोकांना हसवू शकलो'. लोक या व्हिडीओवर भरभरून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. 
 

Read in English

Web Title: Doctor kk Aggarwal got vaccinated without wife whatever happened after this gone viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.