Avengers Endgame म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच होती.  जगभरातील सर्वच चाहत्यांनी संपूर्ण मारवेल सिरीजच डोक्यावर घेतली. त्यानंतर आलेला 'एवेंजर्स सीरिज'चा Avengers Endgame जगभरातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट आहे. खरं तर या संपूर्ण सिरिजने सूपर हिरोंचं चित्रच पालटून टाकलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.79 बिलियन डॉलरची कमाई केली आहे. 

खरं तर या चित्रपटाने अनेक चाहत्यांना भावून केलं आहे. कारणही तसचं होतं म्हणा, चित्रपटात मार्वल सिरिजमधील सर्वात पॉप्युलर कॅरेक्टर 'आयर्न मॅन'चा मृत्यू झाला. शेवची फॅन ते फॅनच... चित्रपट रिलिज होऊन तीन महिने झाले तरिही फॅन्स त्यांच्या 'आयर्न मॅन'चा मृत्यूच्या प्रसंगातून बाहेर आलेले नाहीत. 

हॉलिवूडच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअरने २००८ मध्ये आयर्न मॅन रूपात धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मार्व्हल स्टुडिओमध्ये हे त्याचं डेब्यू होतं. त्यानंतर मार्व्हलच्या आयर्न मॅन सीरिजमध्ये त्याने काम केलं.

धमाकेदार अ‍ॅक्शन करणारा आणि तेवढाच ह्यूमर असलेला हिरो प्रेक्षकांना चांगलाच आवडला. त्यानंतर रॉबर्टने ११ वर्षांपर्यंत मार्व्हल सिनेमासाठी आयर्न मॅनचा रोल केला आणि २९ एप्रिलला रिलीज झालेल्या Avengers Endgame मध्ये तो शहीद झाला.

आयर्न मॅनच्या मृत्यूच्या दृश्याने प्रेक्षकांची डोळे पाणावले. खरं तर Avengers Endgame चा एन्ड त्यांच्या आवडत्या कॅरेक्टरच्या मृत्यूने होईल याचा विचार कोणत्याही फॅनने चुकूनही केला नसेल. या चित्रपटातील असाच एक Deleted Scene समोर आला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. फॅन्स हा सिन पाहून भावूक होत आहेत. 

जवळपास दीड मिनिटांचा हा सीन एडिटिंग करताना डिलीट करण्यात आला होता. हा तोच सीन आहे, जेव्हा थानोसकडून इन्फिनिटी स्टोन परत मिळवताना आयर्न मॅन म्हणजेच, टोन स्टार्कचा मृत्यू होतो.

चित्रपटातील या सीनने प्रेक्षकांना फार हैराण केलं होतं. अनेकांचे डोळे पाणावले होते. या व्हायरल सीनमध्ये आयर्न मॅनचा मृत्यूनंतर प्रत्येक सुपरहिरो गुडघ्यांवर बसून त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. 

जेव्हा हा सीन कट केल्याबाबत फिल्मच्या डायरेक्टरने रूसो ब्रदर्सकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी 'यूएसए टुडे'ला सांगितले की, 'हा एक फार सुंदर सीन आहे. आम्ही हा टोनी  स्टार्कच्या अंतिम संस्काराआधी शुट केला होता. त्यानंतर एडिटिंग दरम्यान आम्हाला अंतिम संस्कार करतानाचा सीन जास्त भावूक वाटला. त्यामुळे आम्ही युद्धाच्या नंतर असणारा हा सीन डिलीट केला.'

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या सीनला सोशल मीडियातून प्रचंड रिस्पॉन्स मिळत आहे. अनेक फॅन्सचं म्हणणं आहे की, सर्वात पॉप्युलर आणि सर्वात प्रभावी सुपरहिरोची विदाई अशीच व्हायला हवी. 


Web Title: This deleted scene from avengers endgame of final tribute to tony stark is going viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.