Coronavirus: ‘या’ ज्योतिषाची अनोखी भविष्यवाणी; “कोरोनाचं नाव बदला मग महामारी संपुष्टात येईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 05:33 PM2021-05-10T17:33:51+5:302021-05-10T17:35:11+5:30

ट्विटरवर इम्तियाज महमूद नावाच्या युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात कॅप्शन लिहिलंय की जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनाचा सामना करावा लागला आहे.

Coronavirus: Unique prediction of ‘this’ astrology; “Change Corona Name, Then the Epidemic Will End | Coronavirus: ‘या’ ज्योतिषाची अनोखी भविष्यवाणी; “कोरोनाचं नाव बदला मग महामारी संपुष्टात येईल”

Coronavirus: ‘या’ ज्योतिषाची अनोखी भविष्यवाणी; “कोरोनाचं नाव बदला मग महामारी संपुष्टात येईल”

Next
ठळक मुद्देही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. युजर्स हा फोटो स्वत: पोस्ट करू लागले आणि त्या व्यक्तीची खिल्ली उडवू लागलेत कोणीतरी यांना विचारा जर नावाच्या स्पेलिंगमध्ये काही बदल केला तर अमेरिकेचं राष्ट्रपती बनू शकतं का? अलीकडेच एका व्यक्तीने ट्विटरवर २०१३ मध्येच कोरोना येणार असल्याची जाहीर केल्याचा दावा केला होता.

कोरोनानं संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. केवळ भारतच नाही तर सर्वच देश या महामारीचा सामना करत आहेत. जेव्हापासून हा आजार पसरू लागला आहे तेव्हापासून त्याची सुरुवात कशी झाली आणि संपणार कधी याबाबत विविध संशोधन सुरू आहेत. परंतु अद्याप कोणीही कोरोना महामारीचा अंत कधी होणार या निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाहीत. याचवेळी एका व्यक्तीने दावा केलाय की, कोरोनाचं नाव बदलल्याने ही महामारी संपुष्टात येईल.

ट्विटरवर इम्तियाज महमूद नावाच्या युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात कॅप्शन लिहिलंय की जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनाचा सामना करावा लागला आहे. आता या आजारावर तोडगा मिळाला आहे तो हाच आहे. या पोस्टमध्ये एका व्यक्तीचा फोटो छापला आहे. त्यासोबत त्याचा मोबाईल नंबरही दिला आहे. यात त्याने दावा केलाय की, जर तुम्ही Corona ची स्पेलिंग CARONAA किंवा Covid 19 ऐवजी COVVIYD 19 केलं तर ही महामारी संपुष्टात येईल.

ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली. युजर्स हा फोटो स्वत: पोस्ट करू लागले आणि त्या व्यक्तीची खिल्ली उडवू लागलेत. कोणी या व्यक्तीला ज्योतिषी म्हणतोय तर कोणी असं पहिलं का झालं नाही. एका युजरने कमेंटमध्ये म्हटलंय की, कोणीतरी यांना विचारा जर नावाच्या स्पेलिंगमध्ये काही बदल केला तर अमेरिकेचं राष्ट्रपती बनू शकतं का? नंदिनी नावाच्या युजरने पोस्ट केलंय की, हे तर ज्योतिषांचे ज्योतिषी आहेत. तर काही जण Whats an Idea Sir अशी कमेंट करत आहेत.

दरम्यान याआधीही ज्योतिषशास्त्रज्ञांनी कोरोना महामारी पसरण्यासाठी दोन ग्रह राहु आणि केतू जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. कोणत्याही मोठ्या ग्रहणावेळी समस्या उद्भवते तेव्हा महामारी पसरते आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. ज्योतिषी ज्योती कौशल म्हणाले होते की, मंगळ आणि गुरु धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा कोरोना व्हायरसपासून थोडा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं होतं. अलीकडेच एका व्यक्तीने ट्विटरवर २०१३ मध्येच कोरोना येणार असल्याची जाहीर केल्याचा दावा केला होता. Marco Acortes ने ३ जून २०१३ मध्ये ट्विटरवर लिहिलं होतं की, कोरोना व्हायरस येत आहे. त्यावेळी कोरोनाबाबत कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता इतक्या वर्षांनी ट्विटरवर या व्यक्तीचं ट्विट व्हायरल होत होतं. अनेकांनी प्रसिद्ध होण्यासाठी केलेला स्टंट आहे असं म्हटलं होतं.

Web Title: Coronavirus: Unique prediction of ‘this’ astrology; “Change Corona Name, Then the Epidemic Will End

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.