CoronaVirus : ६ वर्षाच्या चिमुरड्याने दुसऱ्यांदा केली कोरोनावर मात, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 03:57 PM2020-04-06T15:57:59+5:302020-04-06T15:58:24+5:30

कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन वयोवृध्द माणसांपासून नवजात बालकापर्यंत सगळ्यांनाच होत आहे. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

CoronaVirus : America 6 year old boy suffering from cystic fibrosis recovers from coronavirus myb | CoronaVirus : ६ वर्षाच्या चिमुरड्याने दुसऱ्यांदा केली कोरोनावर मात, व्हिडीओ व्हायरल...

CoronaVirus : ६ वर्षाच्या चिमुरड्याने दुसऱ्यांदा केली कोरोनावर मात, व्हिडीओ व्हायरल...

Next

सध्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण झाले आहे. अशा परिस्थिीत जास्तीत जास्त लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवता यावं यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जगभरातसह  भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन वयोवृध्द माणसांपासून नवजात बालकापर्यंत सगळ्यांनाच होत आहे. अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 हा मुलगा अमेरिकेतील असून कोरोनापासून पूर्णपणे बरा झाला आहे. अमेरिकेतील ३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. असे असले तरी अमेरिकेत १४ हजारहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. अशाच एका अमेरिकेतील क्लार्क्सव्हिल शहरात राहणाऱ्या एका ६ वर्षांच्या मुलाने कोरोनावर मात केली आहे. जोसेफ बोस्टेन नावाच्या या ६ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर निरोगी होऊन जोसेफ घरी परतला.


आईच्या फेसबुकवरून कोरोनावर मात करत घरी परतलेल्या जोसेफनं  एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये मी जिंकलो, मी जिंकलो असे जोसेफ ओरडत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून लोकांनी, असा आदर्श घ्यावा अशा कमेंट केल्या आहेत. ( हे पण वाचा- बाबो! बिकीनी घालणारी जगातली पहिली मॉडल, रातोरात तिला आली होती 50 हजार पत्रे!)

सोशल मीडियावर त्याला डेथ किंग म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे याआधी जोसेफला सिस्टिक फायब्रॉसिस हा फुफ्फुसांचा अनुवांशिक आजार झाला होता. या जीवघेण्या आजाराला हरवल्यानंतर जोसेफनं कोरोनावरही मात केली. जोसेफला सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसल्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांनंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण याही आजारातून हा चिमुरडा सुखरूप बाहेर पडला. ( हे पण वाचा-Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्... )

Web Title: CoronaVirus : America 6 year old boy suffering from cystic fibrosis recovers from coronavirus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.