Chennai Metro Stuck Video: मंगळवारी सकाळी चेन्नईमेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एका अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. विन्को नगर डेपोकडे जाणारी ब्लू लाईन मेट्रो ट्रेन ही सेंट्रल मेट्रो आणि हायकोर्ट स्टेशनदरम्यान असलेल्या एका बोगद्यात अचानक बंद पडली, ज्यामुळे प्रवाशांना अंधारातून पायी चालत पुढील स्टेशन गाठावे लागले.सकाळच्या गर्दीच्या वेळी ही घटना घडली. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो ट्रेन बोगद्यात अडकली आणि ट्रेन थांबताच डब्यांमधील वीजपुरवठाही खंडित झाला. यामुळे प्रवाशांना संपूर्ण अंधारात अडकावे लागले. सुमारे १० मिनिटे अडकल्यानंतर, मेट्रो अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना घोषणा ऐकू आली की, त्यांना हायकोर्ट स्टेशनवर चालत जावे लागेल.
अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या मार्गावरून पायी चालण्यास सुरुवात केली. त्यांनी बोगद्याच्या आत मार्गावर रांग लावली आणि हायकोर्ट स्टेशनवर पोहोचण्यासाठी सुमारे ५०० मीटर चालत गेले. यावेळी, बोगद्यातील आपत्कालीन दिवे आणि मेट्रो कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. प्रवाशांनी अंधारात मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या टॉर्चचा वापर केल्याचेही सांगण्यात येत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही गैरसोय झाल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी होती. अचानक वीज खंडित झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवली असावी, असे मानले जात आहे.
घटनेनंतर काही वेळातच चेन्नई मेट्रोने ट्विटरवर पोस्ट करून सेवा पूर्ववत झाल्याची माहिती दिली. त्यांनी विमानतळ ते विन्को नगर डेपोपर्यंत ब्लू लाईनवरील आणि सेंट्रल मेट्रो ते सेंट थॉमस माउंटपर्यंत ग्रीन लाईनवरील सेवा सामान्य झाल्याचे स्पष्ट केले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत, असे म्हणत मेट्रो प्रशासनाने प्रवाशांची माफी मागितली.
Web Summary : Chennai Metro's blue line stalled in a tunnel due to a technical glitch. Passengers walked 500 meters in darkness to the High Court station, using phone flashlights. Service resumed; officials apologized for the inconvenience.
Web Summary : चेन्नई मेट्रो की ब्लू लाइन तकनीकी खराबी के कारण सुरंग में रुकी। यात्रियों ने फोन की रोशनी का उपयोग करते हुए अंधेरे में 500 मीटर चलकर हाई कोर्ट स्टेशन पहुंचे। सेवा फिर से शुरू; अधिकारियों ने असुविधा के लिए माफी मांगी।