'या' फोटोत दडले आहेत ५८ कलाकार; तुम्हाला किती सापडताहेत? बघा जमतंय का हे चॅलेन्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 07:59 PM2020-09-03T19:59:48+5:302020-09-03T20:28:14+5:30

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला कलाकारांचे चेहरे ओळखायचे आहेत.

Can you spot these 58 indian tv characters in this one picture | 'या' फोटोत दडले आहेत ५८ कलाकार; तुम्हाला किती सापडताहेत? बघा जमतंय का हे चॅलेन्ज...

'या' फोटोत दडले आहेत ५८ कलाकार; तुम्हाला किती सापडताहेत? बघा जमतंय का हे चॅलेन्ज...

Next

तुम्ही कतीही नाकारलं तरी टिव्ही, फेसबुक, मोबाईल यांसारख्या सोशल मीडिया माध्यामांशी तुमचा संबंध येतो. टेलिव्हिजनवरील पात्र आणि आपलं कुटुंब यांचे एक वेगळंच नातं आहे. आईची  ७ ते १० सिरियल पाहण्यासाठी खटाटोप, कोणाला बातम्या तर कोणाला रिएलिटी शोव्ह तर अनेकांना मॅच पाहण्यात रस असतो.  वेगवेगळ्या मार्गांना आपण सिनेमातील आणि मालिकेतील पात्रांशी जोडलेले असतो. सोशल मीडियावर कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत इंटरेस्टींग गोष्टी वाचायला मिळतात. 

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला कलाकारांचे चेहरे ओळखायचे आहेत. तब्बल ५८ कलाकारांचा यात समावेश आहे. राजेश केजरीवाल नावाच्या ट्विटर युजरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुरदर्शनपासून इतर  मनोरंजनाच्या चॅनेल्समधील अनेक पात्र तुम्हाला यात दिसून येतील. लोकांना या फोटोवर कमेंट्स करून आपण ओळखलेल्या कलाकारांबाबत माहिती दिली आहे. 

तुम्हीही कलाकारांना ओळखल्यानंतर त्यांची नावं कमेंट करू शकता.  याआधीही सोशल मीडियाावर वेगवेगळ्या जाहिरातींचा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये ४० पेक्षा जास्त जाहिराती होत्या. या फोटोलाही लोकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. आता कलाकरांच्या फोटोंनी नेटीझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

हे पण वाचा-

Video : नादच खुळा! केस कापण्याची 'अशी' स्टाईल पाहून म्हणाल, 'हा असला कसला न्हावी'...

Video : मूर्ती लहान पण किर्ती महान! 'या' चिमुरड्याचे पुशअप्स पाहून थक्क झाले पैलवान

Web Title: Can you spot these 58 indian tv characters in this one picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.