ब्रेस्टच्या साइजपासून ते कंबरेच्या साइजपर्यंत, लग्नासाठी तरूणाने दिली 'ही' विचित्र जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 04:36 PM2021-11-24T16:36:10+5:302021-11-24T16:37:24+5:30

Social Viral : सोशल मीडियावर एक फारच विचित्र आणि संतापजनक अशी लग्नाची जाहिरात व्हायरल आली आहे. रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने लग्नाच्या जाहिरातीची स्क्रीनशॉट टाकला आहे.

Breast size to feet size bizarre matrimonial advt goes viral | ब्रेस्टच्या साइजपासून ते कंबरेच्या साइजपर्यंत, लग्नासाठी तरूणाने दिली 'ही' विचित्र जाहिरात

ब्रेस्टच्या साइजपासून ते कंबरेच्या साइजपर्यंत, लग्नासाठी तरूणाने दिली 'ही' विचित्र जाहिरात

Next

लग्नासाठीच्या म्हणजे वधू-वर पाहिजे अशा जाहिराती नेहमीच वृत्तपत्रांमध्ये बघायला मिळतात. अलिकडे हे प्रमाण ऑनलाईन अधिक वाढलं आहे. लग्नाच्या या जाहिराती किती विचित्र असू शकतात हे वेळोवेळी समोर आलेल्या काही जाहिरातींवरून दिसून येतं. मुलाचा पगार, उंची, रंगापासून ते कमी वय, रंग, धर्म सुद्धा त्यात दिला असतो. 

सोशल मीडियावर एक फारच विचित्र आणि संतापजनक अशी लग्नाची जाहिरात व्हायरल आली आहे. रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने लग्नाच्या जाहिरातीची स्क्रीनशॉट टाकला आहे. Betterhalf.ai वर देण्यात आलेल्या या जाहिरातीत व्यक्तीने त्याच्या पत्नीमध्ये एकूण १३ क्वालिटीज असल्या पाहिजे असं लिहिलंय. त्यात त्याने वधूच्या वेगवेगळ्या अवयवांचं माफही लिहिलं आहे.

जाहिरातीत व्यक्तीने सर्वातआधी लिहिलं की, त्याची होणारी पत्नी जुन्या विचारांची पण लिबरल असावी. पुढे त्याने लिहिलं की, होणाऱ्या नवरीची उंची 5'2" ते 5'6" दरम्यान, वजन ४८ किलो ते ५२ किलो दरम्यान असावं. तसेच त्याने फारच लाजिरवाणी अट ठेवली आहे. या व्यक्तीने होणाऱ्या नवरीची ब्रेस्ट साइज, कंबरेची साइज आणि पायांची साइज लिहिली आहे.

ही व्यक्ती इतक्यावरच थांबली नाही. त्याने असंही लिहिलं की, होणारी पत्नी चांगल्याप्रकारे  मॅनिक्योर आणि पॅडिक्योर कऱणारी असावी आणि बेडवर वेगवेगळे कॉस्च्युम घालण्यास तयार व्हायला हवी. शेवटी त्याने होणाऱ्या वधूचं वयही सांगितलं. त्याने लिहिलं की, वधूचं वय १८ ते २६ दरम्यान असावं. या व्यक्तीवर सोशल मीडियातून टिका केली जात आहे.
 

Web Title: Breast size to feet size bizarre matrimonial advt goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.