शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 07:53 PM2020-07-15T19:53:00+5:302020-07-15T20:02:19+5:30

Nikki walker ने या मुलाच्या बहादुरीचा किस्सा इन्स्टावर सांगितला आहे. ९ जुलैची ही घटना आहे.

This brave 6 year old boy bridger walker who saved is sister from dog attack | शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

शाब्बास रे पठ्ठ्या! ६ वर्षीय भावाने कुत्र्यापासून बहिणीला वाचवले, जखमी इतका झाला की ९० टाके पडले...

Next

अनेक लहान बहादूर मुलांचे किस्से अनेकदा ऐकले किंवा पाहिले असतील. अमेरिकेतील अशाच एका बहादूर मुलाच्या कारनाम्याची चर्चा होत आहे. इथे एका ६ वर्षीय मुलाने त्याच्या लहान बहिणीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले आहे. त्याच्या लहान बहिणीवर कुत्र्याने अटॅक केला होता. तिला वाचवताना तो स्वत: गंभीर जखमी झाला आणि त्याला ९० टाकेलावावे लागले. पण त्याने त्याच्या बहिणीला काहीही होऊ दिलं नाही.

Nikki walker ने या मुलाच्या बहादुरीचा किस्सा इन्स्टावर सांगितला आहे. ९ जुलैची ही घटना आहे. बहिणीवर हल्ला करत असलेल्या कुत्र्याशी स्वत: भिडून त्याने तिचा जीव वाचवला. त्याने कुत्र्याला बहिणीपर्यंत पोहोचूच दिलं नाही.

कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला. तो बहिणीचा हात धरून धावू लागला. कुत्र्याने त्याला इतकं गंभीर जखमी केलं होतं की, त्याच्या चेहऱ्यावर ९० टाके लावावे लागले.

निकीने इन्स्टावर हे पोस्ट करून Bridger ची बहादूरी जगासमोर आणली. आता तर ही पोस्ट ३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पसंत केली आहे. यात ती सांगते की, जेव्हा Bridger ला विचारलं गेलं की, तुला भीती नाही का वाटली? तर तो म्हणाला की, जर कुणी मरणार असेल, तर तो  मीच असेल. सध्या तो बरा होत आहे. खरंच या चिमुकल्याच्या बहादुरीला सलाम!

Shocking! पाणी प्यायला हौदात जात होता अजगर, पोट पाहून अवाक् झाले लोक...

बापरे! बाटलीत पेट्रोल दिलं नाही; म्हणून रागात महिलेच्या अंगावर सोडले साप, व्हिडीओ व्हायरल

Web Title: This brave 6 year old boy bridger walker who saved is sister from dog attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.