Boy woos tinder match by making pasta post goes viral on twitter | टिंडरवरील तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी 'याने' केला असा फंडा, तरूणीसोबतच पब्लिकही झाली फिदा!
टिंडरवरील तरूणीला इम्प्रेस करण्यासाठी 'याने' केला असा फंडा, तरूणीसोबतच पब्लिकही झाली फिदा!

आता मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलीच्या घराजवळ चकरा मारणे या गोष्टी आता मागे पडल्या आहेत. पूर्वी मुलं पार्कमध्ये फिरत मुली बघायचे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. टिंडरसारख्या डेटिंग अॅपमुळे लोक आता एका क्लिकने प्रेम शोधत आहेत. अशाच एका तरूणाची एक अजब कहाणी सध्याच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या तरूणाने टिंडरवरील एका मुलीला इम्प्रेस करण्यासाठी खास आयडिया केली.

'इनसायडर' च्या रिपोर्टनुसार, एन्ड्र्यू वॅंग न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो. टिंडरवर त्याचं प्रोफाइल एका टिली नावाच्या मुलीशी  मॅच झालं. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं. घटना गेल्या मंगळवारची आहे. एन्ड्र्यूने टिलीला तिच्या अपेक्षा आणि स्वप्नांबाबत विचारलं. टिलीन सांगितले की, तिला स्क्रीनरायटर, कॉमेडियन आणि शेफ पसंत आहेत.

झालं एंड्र्यू टिलीला इम्प्रेस करण्यासाठी सज्ज झाला. 'शेफ' या शब्दामुळे त्याला ग्रीन सिग्नल मिळाला. पण एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. एंड्र्यू टिंडरवर टिलीला फोटोज पाठवू शकत नव्हता. त्यामुळे त्याने ट्विटरवर एक नवीन अकाऊंट तयार केलं. त्याने या अकाऊंटचं नाव ‘Tortellinis for Tilly’ असं ठेवलं. गुरूवारी एकापाठी एक त्यांनी ६ ट्विट केले. पास्ता तयार केला आणि तो तयार करण्याची रेसिपी सुद्धा सांगितली. यावर टिलीच काय ट्विटर यूजरही फिदा झाले.

एंड्र्यूने पाच फोटोंच्या माध्यमातून पास्ता तयार करण्याची पद्धत सांगितली आणि सहावा त्याने त्याचा सेल्फी पोस्ट केला. त्याच्या या पास्ता थ्रेडला एक लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. सोबतच रिट्विट आणि कमेंटही मिळाल्या. 

टिली फिदा झाली का?

एंड्र्यूची मेहनत फळाला आली. ट्विटरवर टिली नावाच्या यूजरने रिप्लाय केला. तिने लिहिले की, 'हा फारच प्रेमळ तरूण आहे....त्याने मला पास्ता दाखवण्यासाठी ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं. कारण तो मला टिंडरवर फोटो पाठवू शकत नव्हता'. आता दोघांचं सूत जुळलं असून दोघेही लवकरच डेटिंग करणार आहेत.


Web Title: Boy woos tinder match by making pasta post goes viral on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.