Photographer fell : समुद्र किनारी प्रपोज करता होता पठ्ठ्या; अचानक फोटोग्राफर तोंडावर आपटला अन् मग, पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:31 PM2021-05-12T18:31:48+5:302021-05-12T18:35:34+5:30

Boy proposed to the girl suddenly photographer fell : हा व्हिडीओ पाहून इतरांप्रमाणेच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल.

Boy proposed to the girl suddenly photographer fell on the ground with his camera people loves it see funny video | Photographer fell : समुद्र किनारी प्रपोज करता होता पठ्ठ्या; अचानक फोटोग्राफर तोंडावर आपटला अन् मग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photographer fell : समुद्र किनारी प्रपोज करता होता पठ्ठ्या; अचानक फोटोग्राफर तोंडावर आपटला अन् मग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

सोशल मीडियावर नेहमीच गमतीदार  व्हिडीओज व्हायरल होत असतात. लग्न, साखरपू़डा, प्री वेडिंगचे फोटो शूट नेहमीच व्हायरल होत असते. असाच एक गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून इतरांप्रमाणेच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल. हा व्हिडीओ एका कपल्सचा आहे. जे एकमेकांना प्रपोज करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडीओत फोटोशूट  करता करता फोटोग्राफर तीनवेळा खाली पडतो. 

हा व्हिडिओ @ fred035schultz नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ सोबतचे कॅप्शन लिहिले आहे की, 'Engagement चा योग्य फोटो काढणे इतके सोपे नाही ... त्यासाठी थांबा.' व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक माणूस त्याला आपल्या मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी बीचवर नेतो.
 त्याच्यासमवेत फोटोग्राफर देखील आहेत.

तो माणूस रिंग परिधान करण्यासाठी  मुलीच्या जवळ जातो. त्याचवेळी फोटोग्राफर  खाली पडतो. पण  कोणालाच काही पडलेलं नसतं. हे दोघंजण आपलं आपलं  प्रेमाचा आनंद घेण्यात  व्यस्त असतात.  तो जोडप्याला थांबायला सांगतो, पण जोडपं त्याच्याकडे लक्ष देत नाही. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

तुम्ही असा व्हिडीओ यापूर्वी कधीच पाहिला असेल. लोक हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहात आहेत. व्हिडिओ आत्तापर्यंत 5 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यासह, लोकांनी गमतीदार कमेंट्स देखील केल्या आहेत. सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'

Web Title: Boy proposed to the girl suddenly photographer fell on the ground with his camera people loves it see funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.