कुत्र्यासोबत केलं संतापजनक कृत्य, मात्र असा तोंडावर आपटला की पुन्हा करण्याची हिम्मत करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 07:53 PM2021-09-13T19:53:28+5:302021-09-13T19:54:21+5:30

मुक्या प्राण्यांना त्रास देताना शंभर वेळा विचार केला पाहिजे कारण हे प्राणी जरी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकत नसले तरी काहीवेळा चांगला धडा शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

boy plays trick with dog falls down funny video goes viral on social media | कुत्र्यासोबत केलं संतापजनक कृत्य, मात्र असा तोंडावर आपटला की पुन्हा करण्याची हिम्मत करणार नाही

कुत्र्यासोबत केलं संतापजनक कृत्य, मात्र असा तोंडावर आपटला की पुन्हा करण्याची हिम्मत करणार नाही

Next

तुमच्या कर्माची फळं तुम्हाला लगेच मिळतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना विचारपुर्वकच केली पाहिजे. विशेषत: मुक्या प्राण्यांना त्रास देताना शंभर वेळा विचार केला पाहिजे कारण हे प्राणी जरी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकत नसले तरी काहीवेळा चांगला धडा शिकवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एका मुलाने कुत्र्यासोबत जे काही केलं ते पाहुन तुमचा संताप अनावर होईल...

व्हिडिओमध्ये दिसतं, की एक मुलगा आपल्या कारच्या बाहेर एक स्टिक घेऊन उभा आहे आणि कुत्रा कारच्या दरवाजाच्या बाहेर खेळण्याच्या मूडमध्ये आहे. कुत्रा स्टिक घेऊन येण्याचा आपला आवडता खेळ खेळण्यासाठी तयार होतो. मात्र, हा मुलगा कुत्र्याची फजिती करण्याच्या विचारात आहे. मुलगा स्टिक आपल्या उजव्या बाजूला फेकण्याचं नाटक करतो आणि कुत्रा त्याच बाजूला धावत जातो. मात्र, इतक्यात हा मुलगा ही काठी डावीकडे फेकतो. हे पाहून गोंधळलेला कुत्रा मुलालाच जाऊन धडकतो आणि मुलगा खाली कोसळतो.

व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्यक्तीच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. काही लोकांनी म्हटलं की अशा वाईट कामांचं फळ देव लगेचच देतो. अनेकांनी कुत्र्याबद्दल चिंता व्यक्त करत म्हटलं, की या मुक्या प्राण्याची यात काय चूक होती. या व्यक्तीनं कुत्र्यासोबत असं का केलं, असा प्रश्न अनेकांनी कमेंटद्वारे केला आहे.

Web Title: boy plays trick with dog falls down funny video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.